Sunday, February 23, 2025
Home कॅलेंडर करीना कपूरचा धाकटा नवाब झाला एक वर्षाचा, भाऊ तैमूरसोबत खेळताना दिसला चिमुकला जेह

करीना कपूरचा धाकटा नवाब झाला एक वर्षाचा, भाऊ तैमूरसोबत खेळताना दिसला चिमुकला जेह

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यांचा धाकटा नवाब जेह अली खान सोमवारी (२१ फेब्रुवारी) एक वर्षाचा झाला आहे. आज जेहचा पहिला वाढदिवस आहे. छोट्या नवाबच्या वाढदिवसानिमित्त सैफ आणि करीनाच्या घरात जल्लोषाचे वातावरण आहे. या खास दिवशी करीनाने तिच्या लहान राजकुमारला तिची दोन मुले जेह आणि तैमूर यांचा एक गोंडस फोटो चाहत्यांसोबत शेअर करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीनाने मुलाला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा
करीनाने तिच्या चिमुकल्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिच्या दोन मुलांचा एक मोहक फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. फोटोमध्ये तैमूर आणि जेह खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तैमूर जमिनीवर मागे-पुढे रेंगाळत आहे. तर छोटा जेह त्याच्या भावाच्या मागे जात आहे. दोन्ही भावांना एकाच फ्रेममध्ये असे खेळताना पाहून चाहते आनंदित झाले आहेत.

तैमूर आणि जेहच्या क्युट फोटोसोबत करीनाने खूप क्यूट कॅप्शनही लिहिले आहे. करीनाने जेहच्या वतीने तैमूरसाठी मेसेज लिहिला की, “भाऊ, माझी वाट बघ. आज मी एक वर्षाचा झालो आहे. एकत्र जगाला एक्सप्लोर करूया. अम्माही प्रत्येक जागेवर आपल्या मागे आहे.” करीनाने पुढे लिहिले की, “हॅप्पी बर्थडे मेरे जेह बाबा. माझा जीव, माझा मुलगा, माझा वाघ.”

जेहवर कलाकार व्यक्त करतायेत प्रेम
अवघ्या एका तासात लाखो चाहत्यांनी करीना कपूर खानचा मुलगा जेहसाठी केलेल्या पोस्टला लाईक केले आहे. कमेंट सेशनमध्ये चाहते छोट्या जेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. सबा पतौडीने लिहिले की, “हॅपी बर्थडे जेह जान. तुझ्यावर आणि टिमवर प्रेम आहे.” दिया मिर्झाने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा जेह.” सोहा अली खानने लिहिले की, “हॅपी बर्थडे जेह बाबा.” मनीष मल्होत्राने हृदयाच्या इमोजीसह जेहला खूप प्रेम दिले आहे.

कलाकारांव्यतिरिक्त, अनेक चाहते लहान जेहला त्याच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त खूप प्रेम देत आहेत आणि त्याला शुभेच्छा देत आहेत. करीना आणि सैफचा छोटा राजकुमार जेह यांनाही आम्ही खूप प्रेम देतो.

हेही वाचा :

हे देखील वाचा