×

अंबानी कुटुंबात वाजले सनई चौघडे, अनमोल अंबानी आणि कृशा शाह यांचा विवाह संपन्न

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांच्या घरी सनई चौघडे वाजले आहेत. या बातमीची त्यांनी अधिकृत घोषणा केली नसली तरी या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत. अंबानी कुटुंबात कोण अडकले आहे विवाह बंधनात चला जाणून घेऊ.

देशातील प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी आणि टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी विवाह बंधनात अडकले आहेत. त्याने कृशा शाहसोबत लग्नाची गाठ बांधले आहेत. या शाही विवाह सोहळ्याचे फोटो सध्या समोर आले आहेत. या फोटोमध्ये अनमोल आणि कृशाची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत असते. अनमोल आणि कृशा यांच्या लग्नाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या लग्नाची अनमोल आणि त्यांच्या कुटुंबाकडून अद्याप कसलीही अधिकृत घोषणा केली नव्हती मात्र समोर आलेल्या फोटोमुळे दोघेही विवाह बंधनात अडकल्याचे निश्चित झाले आहे.

अनमोल आणि कृशा यांचे अनेक दिवसांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. लग्नात अनमोलने लाइट ग्रे कलर शेरवानी घातली होती. तर कृशाने लाल रंगाची भारदस्त लेहंगा घातला होता ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. दोघांच्या फोटोचीच चर्चा पाहायला मिळत आहे. या शाही विवाह सोहळ्यात अनेक मोठमोठ्या कलाकारांनी उपस्थिती दर्शविली होती. यामध्ये अभिषेक बच्चन, नताशा नंदा, पिंकी रेड्डी हे अशी दिग्गज मंडळी उपस्थित होती.

पिंकी रेड्डीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. सध्या याच लग्नाची चर्चा पाहायला मिळत आहे. लग्नात मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी सुद्धा उपस्थित होती. ईशाच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान उद्योजक अनमोल अंबानी वयाच्या 24 व्या वर्षीपासून उद्योजक म्हणून काम पाहत आहेत. त्याचे शालेय शिक्षण मुंबईत झाले.

Latest Post