×

‘क्राईम पेट्रोल’च्या एका एपिसोडसाठी एवढी रक्कम घेतात हे कलाकार, नकारात्मक भूमिकेसाठी घेतात लाखो रुपये

सोनी टीव्हीवरील अनुप सोनी यांचा ‘क्राईम पट्रोल’ हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. गुन्हेगारी जगताचे भीषण वास्तव मांडणाऱ्या या कार्यक्रमाने अनेक वर्ष प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. कार्यक्रमाची आकर्षक मांडणी आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे हा कार्यक्रम दिवसेंदिवस प्रसिद्ध होत चालला आहे. या कार्यक्रमात असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांच्यामुळे ‘क्राइम पट्रोल’ खूपच यशस्वी झाले. या कार्यक्रमामुळेच अनेकांना ओळख मिळाली. जाणून घेऊ या क्राइम पट्रोल कार्यक्रमातील कलाकारांचे मानधन.

निसार खान – ‘क्राइम पट्रोल’ कार्यक्रमात निसार खान यांच्या अभिनयाने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या निसार खान यांनी जोरदार अभिनय साकारला आहे. निसार खान एका भागासाठी १.५ लाख इतकी मोठी रक्कम घेतात.

संजीव त्यागी – ‘क्राइम पट्रोल’ कार्यक्रमात संजीव त्यागी यांच्या अभिनयाचे सर्वात जास्त कौतुक केले जाते. संजीव त्यागी सुद्धा एका भागासाठी एक लाख रुपये इतके मानधन घेतात.

मनीष राज शर्मा – ‘क्राइम पट्रोल’ कार्यक्रमात प्रसिद्ध चेहरा म्हणून मनीष राज शर्मा यांचे नाव घेतले जाते. ते क्राइम पेट्रोलच्या एका भागासाठी 80 हजार रुपये मानधन घेतात.

गीतांजली मिश्रा – अभिनेत्री गीतांजली मिश्रा ‘क्राइम पट्रोल’मध्ये जास्तीत जास्त बोल्ड भूमिका करत असते. या नकारात्मक भूमिकेसाठी तिला मानधनसुद्धा जास्त दिले जाते. गीतांजली एका भागासाठी १.५ लाख इतके मानधन स्विकारते.

देविका शर्मा – ‘क्राइम पट्रोल’ मधील सुंदर चेहरा म्हणून देविका शर्माचे नाव घेतले जाते. देविका एका भागासाठी एक लाख रुपये मानधन मिळते.

शाश्विता शर्मा – पोलिस अधिकाऱ्याच्या दमदार भूमिकेत असलेल्या शाश्विता शर्माच्या अभिनयाची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. शाश्विता एका भागासाठी दीड लाख रुपये इतकी रक्कम घेते.

हेही पाहा –

Latest Post