Saturday, April 19, 2025
Home वेबसिरीज ‘सिक्रेड गेम्स’ वेबसीरिज मिळणार मराठीत अनुभवायला, वाचा कुठे होणार प्रदर्शित

‘सिक्रेड गेम्स’ वेबसीरिज मिळणार मराठीत अनुभवायला, वाचा कुठे होणार प्रदर्शित

वेबसीरिज ही आता प्रेक्षकांमधील एक आवड झाली आहे . कोरोना काळात जेव्हा सगळी चित्रपटगृहे बंद होती, तेव्हा प्रेक्षकांनी वेबसीरिजला खूप प्रतिसाद दर्शवला. हिंदी भाषेतील अनेक वेबसीरिज प्रेक्षकांना आवडल्या. परंतु त्यातील ‘सिक्रेड गेम’ या वेबसीरिजने मात्र अनेकांना भुरळ घातली. या वेबसीरिजमध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासोबत मराठमोळ्या जितेंद्र जोशीचा अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले. त्याने काटेकर ही भूमिका साकारली होती.

याच्या दोन्ही सिरिजला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतले होते. परंतु या वेबसीरिजच्या मराठी प्रेक्षक वर्गासाठी एक आनंदाची बातमी येत आहे. ती म्हणजे ‘सिक्रेड गेम’ ही वेबसीरिज आता आपल्याला मराठीत पाहायला मिळणार आहे. ही वेबसीरिज मराठीमध्ये एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. ही वेबसीरिज मूळ कादंबरी आता मराठीत श्राव्यरुपात स्टोरीटेलने आपल्या रसिकांसाठी प्रकाशित केली आहे.

ही सुप्रसिद्ध वेबसीरिज ज्या प्रसिद्ध कादंबरी बनवण्यात आली आहे. ही कादंबरी आता स्टोरीटेल मराठीवर ऐकायला मिळणार आहे. या कादंबरीचा मराठी अनुवाद मृणाल काशीकर यांनी केला असून सुप्रसिद्ध वॉईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ‘सेक्रेड गेम्स’ भाग १ व २ ची लज्जतदार कहाणी ऐकताना रसिकश्रोते रंगून जातात.

‘सिक्रेड गेम’ ही वेबसीरिज तुम्ही पाहिली असली, तरी ती मराठीत ऐकायला एक वेगळीच मजा येणार आहे, यात काही शंका नाही. ही वेबसीरिज ऐकताना त्यातील एक एक सीन नक्कीच आपल्या डोळ्यासमोर येईल. ‘सेक्रेड गेम्स’ चा हा भन्नाट ऑडिओ फॉर्म अगदी प्रवास करताना, ड्राईव्ह करतानाही आपण निवांत ऐकू शकता! प्रख्यात भारतीय लेखक विक्रम चंद्रा यांची गाजलेली ‘सेक्रेड गेम्स’ ही क्राईम थ्रिलर कादंबरी ‘स्टोरीटेल’ मराठी ऑडिओबुक रुपात दोन भागांमध्ये प्रसिद्ध व्हाईस आर्टिस्ट कृणाल आळवे यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा