×

ट्रान्सजेंडर चित्रपटात देखील मिळत नाही एलजीबीटीक्यू समाजाला संधी, ‘गे’ अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूडचे कास्टिंग दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याशी लढताना एलजीबीटीक्यू एक्टिविस्ट सुशांत दिवगिरीकर यांनी विचारणा केली आहे. त्याने विचारले आहे की, ट्रान्सजेंडरला हिंदी चित्रपटात त्यांचे पात्र निभावण्याचा अधिकार का दिला जात नाही? चित्रपटसृष्टीत ट्रान्सजेंडरची भूमिका अनेक मोठे कलाकार करतात. या मुद्यावरील चर्चा खूप जुनी आहे. आता सुशांत देखील या मुद्यावर प्रश्न उभा करत आहे.

सुशांतने २०१४ मध्ये ‘मिस्टर गे’ हा पुरस्कार मिळाला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुशांत म्हणतो की, “जर एखाद्या चित्रपटात ट्रान्सजेंडरची भूमिका असेल तर मग ट्रान्सजेंडर घ्यायला परवानगी का नाही? त्यांना चित्रपटात पुरुषाची भूमिका निभावण्याची परवानगी नाही. स्त्रियांचे पात्र निभावण्याची परवानगी नाही. मग आता काय त्यांना बॅकग्राउंडला ट्री म्हणून ठेवले जाणार आहे का?” त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/reel/CaQw6S5jNBn/?utm_source=ig_web_copy_link

सुशांतने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “ट्रान्सजेंडर ट्री.” बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनले आहे. ज्यात ट्रान्सजेंडरची कहाणी दाखवली आहे. यात ‘शुभमंगल ज्यादा सावधान’, ‘बधाई हो’, ‘लक्ष्मी’ आणि ‘चंदिगढ की आशिकी’ यांसारख्या चित्रपटाचा समावेश होतो.

या सगळ्या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी गेची भूमिका निभावली आहेत. लोकांचा दृष्टिकोन बदलावा म्हणून हे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणले आहेत. सुशांतने शेअर केलेल्या या व्हिडिओला कमेंट करून अनेकजण त्याला पाठिंबा देत आहेत. तसेच हा खूप मोठा विषय आहे. याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जेणेकरून त्या समाजातील लोकांना देखील पुढे येण्याची संधी मिळेल आणि त्यांच्या कलेला वाव मिळेल. असे मत अनेकजण मांडत आहेत.

हेही वाचा :

Latest Post