×

‘गंगुबाई काठियावाडी’च्या रिलीझपूर्वी वाढल्या अडचणी, भन्साळी प्रोडक्शनला सर्वोच्च न्यायालयाची ‘ही’ सूचना

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) तिच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांचा बहुप्रतिक्षित ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेक वादात सापडला आहे. या चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार असून, तिच्यासोबत अजय देवगण (Ajay Devgan) असणार आहे. हा चित्रपट २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून, त्याची आगाऊ बुकिंगही सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत प्रदर्शनाच्या काही तास आधी या चित्रपटाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे.

या चित्रपटाचे नाव बदलता येईल का, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने भन्साळी प्रॉडक्शनला दिला आहे. चित्रपटावरील बंदीबाबत अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयाने ही सूचना केली. आता सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी या प्रकरणी सुनावणी होणार आहे. दुसरीकडे, एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाविरोधातील दोन याचिका फेटाळून लावल्या आणि चित्रपटाविरोधातील आणखी एक याचिका निकाली काढली.

गंगूबाईच्या कुटुंबाचा या चित्रपटाला विरोध आहे. गंगूबाई यांनी समाजासाठी काम केल्याचे त्यांचे कुटुंबीय सांगतात. पण त्यांना सेक्स वर्कर म्हणून दाखवण्यात आले आहे. खरं तर, गंगूबाईचा दत्तक मुलगा बाबू रावजी शाह ‘गंगूबाई काठियावाडी’ याच्या विरोधात २०२१ साली मुंबई न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान संजय लीला भन्साळी आणि आलिया भट्ट यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले. मात्र, नंतर मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिली. त्याचबरोबर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. प्रेक्षक आलियाच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक करत आहेत.

माध्यमांतील वृत्तानुसार, आलियाने गंगूबाईच्या भूमिकेच्या तयारीसाठी मुंबईच्या रेड लाइट एरियातील कमाठीपुरा येथील खऱ्या सेक्स वर्करसोबत बराच वेळ घालवला होता. आलियाने असे केले होते, जेणेकरून ती तिच्या पात्रात कामाठीपुराच्या सेक्स वर्करच्या रूपात आणि त्याच बोलीभाषेत बोलताना दिसावी. ६० च्या दशकातील माफिया असलेल्या गंगूबाईही कामाठीपुरामध्ये वास्तव्यास होत्या.

आलिया भट्टचा ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट संजय लीला भन्साळी दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटात शंतनू माहेश्वरी आलियासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. याची झलक ‘मेरी जान’ या गाण्यात पाहायला मिळाली आहे. आलिया आणि शंतनू व्यतिरिक्त या चित्रपटात अजय देवगण, विजय राज आणि सीमा पाहवा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा :

Latest Post