Thursday, April 24, 2025
Home साऊथ सिनेमा पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर, पुन्हा प्रेमात पडली समंथा! फोटो शेअर करत दिली माहिती

पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर, पुन्हा प्रेमात पडली समंथा! फोटो शेअर करत दिली माहिती

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रूथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) पती नागा चैतन्यसोबत (Naga Chaitanya) घटस्फोट घेतल्यानंतर चर्चेत आली होती. दोघांनी आपले चार वर्षाचे वैवाहिक आयुष्य सोडून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यानंतर ती अभिनेत्री धनुषसोबत (Dhanush) लग्न करणार असल्याच्याही बातम्या रंगल्या होत्या. मात्र आता तिने शेअर केलेल्या एका फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री समंथा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. यावरुन ती आपल्या चाहत्यांशी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. मात्र अलीकडे तिने एक अशी पोस्ट केली आहे ज्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने प्रेमात पडल्याची माहिती दिली आहे. सोबतच तिने एक फोटो ही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे.

अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन साड्यांचा फोटो शेअर करत प्रेमात प्रिंटेड साड्यांच्या प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे. या व्हायरल फोटोत साडी घातलेली समंथा खूपच मनमोहक दिसत आहे. तिने घातलेल्या साडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही साडी हाताने पेंट केली आहे. याच सुंदर साड्यांच्या प्रेमात पडल्याची कबुली समंथाने दिली आहे. तिच्या या सुंदर फोटोंची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

या फोटोसोबत ती म्हणते की “मी आज सकाळी उठले आणि माझ्या लक्षात आल की मी चित्रपट क्षेत्रात १२ वर्ष पूर्ण केली आहेत. लाइट, कॅमेरा, एक्शनच्या भोवताली फिरणार्‍या आयुष्याने अनेक आठवणी दिल्या आहेत. माझं हे प्रेम कधीच संपू नये.” समंथाच्या या सुंदर पोस्टवर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

हेही वाचा –

हे देखील वाचा