Monday, May 13, 2024

‘बिग बॉस १४’ फेम रुबीना दिलैकला झालीय गंभीर दुखापत, अंगावरच्या पट्ट्या पाहून चाहते पडले चिंतेत

रुबीना दिलैक (Rubina Dilaik) हे टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध नाव आहे. ‘छोटी बहू’ आणि ‘शक्ती-अस्तित्व की’ सारख्या शोद्वारे तिने घराघरात वेगळी ओळख निर्माण केली. जेव्हा रुबीना ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली तेव्हा तिच्या चाहत्यांची यादी लक्षणीय वाढली. या शोमधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली. लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १४’ विजेती रुबीना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. चाहते देखील तिच्या नवनवीन पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात. रुबीनाने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक हृदय पिळवटून टाकणारा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे ती सध्या चर्चेत आली आहे.

या फोटोमध्ये रुबीनाच्या खांद्याला दुखापत दिसत आहे. फोटोमध्ये अभिनेत्रीचा फक्त मागचा भाग दिसत आहे. तिने पाठीच्या दुखापतीचा फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. तसेच तिच्या तब्येतीबद्दल काळजी वाटू लागली आहे. चाहते तिच्या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत, तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.

इंस्टाग्रामवर फोटो केला शेअर
खांद्याच्या दुखापतीचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत रुबीनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सगळं काही तुमच्या योजनेनुसार होत नाही.” तिने कॅप्शनसह रडणारा इमोजी देखील शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या कॅप्शनमध्ये असे दिसते की, तिच्यासोबत काहीतरी वाईट घडले आहे. जरी तिला इतकी गंभीर दुखापत कशी आणि कुठे झाली याबद्दल तिने काहीही सांगितले नाही.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, रुबीनाच्या मागच्या बाजूला डाव्या खांद्याला हीलिंग टेप लावलेला आहे आणि ती खिडकीच्या बाहेर पाहत आहे. फोटोमध्ये तिची फक्त मागची बाजू दिसत आहे. फोटो पाहून तिच्या खांद्याला दुखापत झाल्याचे दिसते. तिचे चाहते रुबीनाच्या पोस्टवर सतत कमेंट करत आहेत आणि तिच्या दुखापतीबद्दल विचारत आहेत. काही चाहते तिच्यासाठी दु:खी होत आहेत. तर काही तिला विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहेत.

अभिनेत्री करतेय बॉलिवूड पदार्पणाची तयारी
रुबीना दिलैक हे टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध नाव आहे. मात्र, ‘बिग बॉस १४’ची विजेती झाल्यानंतर तिच्या चाहत्यांची संख्या वाढली. या शोमधील तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रुबीना सध्या तिच्या बॉलिवूड पदार्पणाची तयारी करत आहे. तिच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे नाव ‘अर्ध’ आहे, ज्याचे शूटिंग सुरू झाले आहे. या चित्रपटात रुबीनाशिवाय हितेन तेजवानी आणि राजपाल यादव देखील दिसणार आहेत. संगीतकार पलाश मुच्छाळ यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या दुनियेत प्रवेश केला आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा