Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

जेव्हा लोक रेमो डिसूझाला ‘कालिया’ म्हणायचे तेव्हा यायचा खूप राग, आईच्या ‘या’ गोष्टीने बदलली विचारसरणी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझाने आपल्या डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये चांगले स्थान निर्माण केले आहे. दिग्दर्शक म्हणूनही त्याने प्रत्येक वेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर येत राहतात, जे येताच व्हायरल होतात. आज रेमोची इंडस्ट्रीत खास ओळख आहे. आपल्या उत्कृष्ट डान्स कौशल्याने चाहत्यांना प्रेरित करणारा रेमो सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. तो अनेकदा त्याची प्रेमळ पत्नी लिझेलसोबत मजेदार रील व्हिडिओ शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. अशात आता रेमाेचा एक जुना रील व्हिडिओ प्रंचड व्हायरल हाेत आहे, ज्याला चाहत्यांची चांगली पसंती मिळत आहे. काय आहे प्रकरण? चला जाणून घेऊया…

लोक रेमोला म्हणायचे कालिया 

रेमो (Remo Dsouza) त्याच्या नवीन रील व्हिडिओमध्ये त्याची पत्नी लिझेलवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रेमोची पत्नीसोबतची केमिस्ट्री चाहत्यांना खूप प्रभावित करत आहे. रेमोने एका खास गाण्यावर बायकोसोबत एक रील व्हिडिओ बनवला आहे. ‘हम काले है तो क्या हुआ दिलवाले है…’ हे गाणे बॅकग्राऊंडला वाजत आहे. व्हिडिओच्या गाण्यासोबतच कॅप्शनही चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. रेमोने कॅप्शनमध्ये खुलासा केला आहे की, त्याच्या गडद रंगामुळे लोक त्याला कालिया आणि कालू म्हणायचे.

रेमो डिसूझाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “लोक मला कालिया, कालू म्हणायचे तेव्हा मला त्याचा तिरस्कार वाटायचा. पण नंतर माझ्या आईने मला सांगितले की, हा माणसाचा रंग नसून हृदय महत्त्वाचे आहे. हे गाणे मी तेव्हा गायले होते आणि तेव्हापासून ते माझे आवडते गाणे बनले आहे. आता मी हे गाणे लिझेलसाठी गात आहे.”

चाहते आणि सेलिब्रिटी रेमोवर करत आहेत प्रेमाचा वर्षाव 

जेव्हापासून रेमो डिसूझाने त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये याचा खुलासा केला आहे, तेव्हापासून चाहते आणि सेलिब्रिटी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. टेरेन्स लुईसने लिहिले की, “काळा सुंदर असतो भाऊ.” त्याचबरोबर त्याचे अनेक चाहते त्याचे कौतुक करताना थकत नाहीत. एका युजरने लिहिले की, “सर तुम्ही एक अद्भुत व्यक्ती आहात. साहेब तुम्ही आमच्या आयुष्यात किती महत्वाचे आहात हे माहित नाही.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “सुपर रेमो सर.” चाहत्यांनी रेमोला आधी कोणत्याही नावाने हाक मारली असेल, पण आता रेमो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतो. त्याच्यासाठी चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे.(director remo dsouza hates when people used to call him kaalia or kalu due to his skin colour)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रामलीला सिनेमाच्या सेटवरचे ‘ते’ चित्र पाहत शरद केळकर म्हणाला होता ‘भन्साळी किती पैसे वाया घालवतात यात मी…’
सिनेमात गुंडांच्या नाकी नऊ आणणाऱ्या अजय देवगणची ‘या’ गोष्टीमुळे टरकते, वाचा कोणती आहे ती गोष्ट

हे देखील वाचा