Monday, February 26, 2024

सिनेमात गुंडांच्या नाकी नऊ आणणाऱ्या अजय देवगणची ‘या’ गोष्टीमुळे टरकते, वाचा कोणती आहे ती गोष्ट

हिंदी सिनेसृष्टीत असे काही कलाकार आहेत, जे त्यांच्या दमदार व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. या कलाकारांमध्ये सुपरस्टार अजय देवगण याचाही समावेश होतो. नुकताच अजयचा ‘भाेला’ सिनेमा रिलीज झाला. या सिनेमामुळे अजय पुन्हा लाईमलाईटमध्ये आला आहे. मात्र, तुम्हाला ही माहिती आहे का? की, ऍक्शन आणि थ्रिलर सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारणारा अजय देवगण एका गोष्टीला घाबरतो. काय आहे ती गोष्ट चला जाणून घेऊया…

‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला खुलासा
द कपिल शर्मा शो‘ (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमात पोहोचल्यानंतर अजय देवगण (Ajay Devgn) याने आपल्या आयुष्यातील अशी एक गोष्ट सांगितली, जी कदाचित अनेक चाहत्यांना माहिती नसेल. अजयने मजा-मस्तीच्या वातावरणात आपल्या भीतीमागील खुलासा केला. त्याने सांगितले की, त्याला बंद आणि लहान जागांशी समस्या आहे. मात्र, यामागे एक कारणही आहे.

अजयने कपिल शर्मा (Kapil Sharma) याच्यासोबत संवाद साधताना सांगितले की, तो लिफ्टसारख्या जागांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतो. त्याला लिफ्टमध्ये ‘क्लॉस्ट्रोफोबिक’ (एक बंद जागा) वाटते. त्यामुळे त्याचा हा प्रयत्न असतो की, तो लिफ्टमध्ये जाणे टाळेल. कपिलने अजयला विचारले की, लोकांना बाथरूममध्ये बंद होण्याची भीती वाटते. तुझी अशी काही भीती आहे का? यावर अजयने सांगितले की, “बाथरूम तर नाही, पण मला लिफ्टमध्ये भीती वाटते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

‘लिफ्टमध्ये वाटते भीती’
अजय देवगण लिफ्टला घाबरतो हे त्याने स्वत:च सांगितले आहे. कपिलच्या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, “मी एकदा लिफ्टमध्ये होतो आणि ती एकदम चौथ्या-तिसऱ्या मजल्यावरून थेट बेसमेंटमध्ये येऊन आपटली. आम्ही आतमध्ये दीड तासापेक्षा जास्त वेळ अडकलो होतो. त्यानंतरपासून मला लिफ्टमध्ये क्लॉस्ट्रोफोबिक वाटू लागले आहे. मी त्यानंतर लिफ्टमधून जाणे बंद केले होते. मी शक्य तितक्या वेळा पायऱ्यांवरून जाऊ लागलो. आताही मी असंच करतो. शक्य असेल, तर लिफ्ट घेत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगणचा सिनेमा
अभिनेता अजय देवगण हा ‘दृश्यम 2’ या सिनेमातून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात त्याच्यासोबत तब्बू, श्रिया सरन, अक्षय खन्ना, इशिता दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. (ajay devgn shared dangerous experience to kapil sharma)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
उफ्फ! आलिया भट्टचा ग्लॅमरस अंदाज, पाहणऱ्याचीही उडेल झाेप

हाेणाऱ्या जावायासाेबत बाेनी कपूर यांनी दिली पाेज? एकदा ‘ताे’ व्हिडिओ पाहाच

हे देखील वाचा