Sunday, July 14, 2024

राहत्या घरीच सापडला मृतदेह, मृत्यूचे कारणही अद्याप अस्पष्ट; रेमो डिसूझाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर

रेमो डिसूझाने (Remo Dsouza) आपल्या डान्सच्या जोरावर बॉलिवूडमध्ये चांगले स्थान निर्माण केले आहे. दिग्दर्शक म्हणूनही त्याने प्रत्येकवेळी स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर येत राहतात, जे येताच व्हायरल होतात. पण आता एक अशी बातमी समोर येत आहे, जी आम्हाला तुम्हालाच नाही, तर खुद्द रेमो डिसूझालाही आश्चर्यचकित करणार आहे. प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर रेमोचे मेहुणे जेसन वॉटकिंसचे निधन झाले आहे. तो त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला.

वॉटकिंसची बहीण आणि रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या भावाचा फोटो शेअर करताना अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. ती म्हणाली की, “का? तू माझ्याशी हे कसे करू शकतोस? मी तुला कधीच माफ करणार नाही.”

Photo Courtesy: Instagram/lizelleremodsouza

एका जवळच्या सूत्राने याला दुजोरा दिला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, एका वैद्यकीय अधिकाऱ्याने जेसनला कूपर रुग्णालयात आणल्याची माहिती दिली आहे आणि ओशिवरा पोलीस आवश्यक कारवाई करत आहेत. रेमो सध्या गोव्यात एका लग्नात सहभागी झाला आहे. जेसन वॉटकिंस दीर्घकाळापासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत होते. रेमोच्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केले.

रेमोशी आतापर्यंत कोणताही संपर्क झाला नाही किंवा त्याने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रेमो हा चित्रपट दिग्दर्शक, कोरिओग्राफर आणि निर्माता आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक चित्रपट केले आहेत. याशिवाय त्याने अनेक डान्स रियॅलिटी शोचे परीक्षणही केले आहे. रेमो हा मायकल जॅक्सनचा चाहता मानला जातो.

मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट
रेमोच्या डान्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ज्यामध्ये तुम्ही मायकेल जॅक्सनचा ‘मूनवॉक’ हा आयकॉनिक मूव्ह्ज पाहू शकता. एकेकाळी बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करणारा रेमो डिसूझा आज अनेक तरुणांचा आदर्श मानला जातो. या वाईट बातमीवर रेमोने अद्याप काहीही सांगितलेले नसले, तरी हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा