Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगचे होळी गाणे रिलीझ, पाहा या गाण्याचा धमकेदार व्हिडिओ

मागील काही महिन्यांपासून फक्त बिहार, उत्तरप्रदेश पुरते सीमित राहणारे भोजपुरी गाणे संपूर्ण भारतात पाहिले आणि ऐकले जात आहे. पाहताना अश्लील वाटणारे भोजपुरी गाणे हटके शब्द आणि उडत्या चालीचे असल्याने सहज ऐकणाऱ्याच्या तोंडावर रुळतात. भोजपुरी गाणे हे वेगवेगळ्या थीमला धरून तयार केले जातात.

अशातच भोजपुरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता आणि गायक पवन सिंग याचे होळीवर आधारित ‘लेहंगवा लस लस करता’ हे नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. पवनचे २०२१ मधील हे पहिलेच प्रदर्शित झालेले गाणे आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले हे गाणे लगेच व्हायरल झाले आहे. वर्ल्डवाइड रेकॉर्ड म्युझिक कंपनीने ‘लहंगवा लस-लस करता’ हे होळी गाणे यूट्यूबवर प्रदर्शित केले आहे

पवन सिंगने गायलेल्या या गाण्याला काही तासातच लाखो व्ह्यूज आले आहेत. हे गाणे पवन सिंग आणि निलीम गिरी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. अतिशय रंगीबेरंगी असणाऱ्या या गाण्यावर पवन आणि नीलम धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. भोजपुरीमध्ये या गाण्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर ज्युनियर डान्सर गाण्यात डान्स करताना दिसत आहे.

हे होळीचे गाणे अरुण बिहारी यांनी लिहिले असून, संगीत छोटे बाबा (बसही) यांनी दिले आहेत. गाण्याचे निर्देशन रवी पंडित यांनी केले असून, नृत्यदिग्दर्शन राहुल, रितिक यांचे आहेत. या गाण्याला प्रेक्षकांचा मिळणार प्रतिसाद पाहून पवन यांनी सांगितले की, “खूप धन्यवाद, मी पुढे देखील तुमच्या सर्वांचे असेच मनोरंजन करत राहील.”
पवन सिंग सध्या जौनपूर येथे त्याच्या आगामी ‘मेरा भारत महान’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात
-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न

हे देखील वाचा