Thursday, April 18, 2024

हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात

प्रत्येक स्त्रीचे लग्न होण्यापूर्वी तिचा आपली एक वेगळी ओळख असते. ती आपल्या पायावर उभी राहून स्वत:चे स्थान निर्माण करत असते. यामध्ये देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेले रिलायन्स ग्रूपचे चेयरमन अनिल अंबानी यांची पत्नी आणि अभिनेत्री टीना अंबानी यांचाही समावेश आहे. त्यांनी अनिल अंबानींची पत्नी होण्यापूर्वी टीनाने अनेक चित्रपटात काम करून चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. त्या आपल्या कामामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अभिनेता संजय दत्त आणि आधी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबतच्या प्रेम संबंधांमुळेही टीनाने माध्यमांचे लक्ष आपल्याकडे वेधले होते. टीना आणि राजेश खन्ना यांची जोडी सर्वाधिक चित्रपटांमध्ये झळकली. या जोडीला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले. आपल्या १३ वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत टीनाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी नुकताच म्हणजे काल (११ फेब्रुवारी) आपला ६४ वा वाढदिवस साजरा केला. चला तर मग त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेळ न घालवता जाणून घेऊया टीनाच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम चित्रपटांबद्दल…

देस परदेस (१९७८)
टीना यांनी १९७५ साली इंटरनेशनल टीन प्रिसेंस कॉन्टेस्ट, स्पेनमध्ये भारताकडून भाग घेतला होता. इथे त्यांनी ‘मिस फोटोजेनिक’ आणि ‘मिस बिकिनी’ पुरस्कार मिळाले होते. या कार्यक्रमामध्ये देव आनंद यांनी टीना यांना पहिल्यांदा पाहिले होते आणि त्यांना आपल्या ‘देस परदेस’ चित्रपटासाठी साईन केले होते. याच चित्रपटातून टीनाने आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात ‘महमूद’, ‘प्राण’, ‘अजित खान’, ‘अजमद खान’ आणि ‘प्रेम चोप्रा’ यांनीही काम केले होते. ही कहाणी एका कुटुंबाची आहे. यातील मोठा मुलगा पैसे कमावण्यासाठी परदेशात जातो. काही काळानंतर जेव्हा मोठ्या मुलाची कोणतीच बातमी मिळत नाही, तेव्हा लहान मुलगा त्याचा शोध घेण्यासाठी परदेशात जातो. तो तिथे जाऊन सुरू असलेले प्रवाश्यांचे शोषण सर्वांसमोर आणतो. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन देव आनंद यांनी केली. टीना या चित्रपटात लाजाळू आणि जगाबद्दल कोणतीही माहिती नसलेल्या ‘गौरी’ या मुलीच्या भूमिकेत होती.

बातों बातों में (१९७९)
आपल्या पदार्पणाच्या चित्रपटानंतर पुढील वर्षी टीनाने बासू चटर्जी दिग्दर्शित ‘बातों बातों में’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात टीनाव्यतिरिक्त ‘अमोल पालेकर’, ‘असरानी’, ‘पर्ल पदमसी’ यांसारखे कलाकार मुख्य भूमिकेत होते. टीनाने या चित्रपटात नॅन्सी परेराची भूमिका साकारली होती, जी आपल्या भाऊ आणि आईसोबत राहत असते. नॅन्सीच्या आईची अशी इच्छा होती की, नॅन्सीचे लग्न एका तरुण श्रीमंत व्यक्तीसोबत व्हावे. या रोमँटिक कॉमेडी सिनेमाला ‘राजेश रोशन’ यांनी संगीत दिले आहे. पूर्ण चित्रपटात एकूण ४ गाणी आहेत. त्यातील तीन गाणी अत्यंत लोकप्रिय झाली. चित्रपट हिट होण्यात या गाण्यांची मोठी भूमिका होती.

कर्ज (१९८०)
आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात टीना मुनीम (अंबानी ) यांना अत्यंत चांगले चित्रपट भेटत होते. यादरम्यान त्यांनी सुभाष घई यांचा ‘कर्ज’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटात टीना ऋषी कपूर, सिमी गरेवाल, राज किरण, प्राण यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश होता. कमाल अमरोही यांच्या ‘महल’ चित्रपटानंतर या चित्रपटातच पुनर्जन्माची कहाणी प्रामुख्याने दाखवण्यात आली. ‘दर्द ए दिल’, ‘दर्द ए जिगर’, ‘दिल में जगाया आपने’, ‘ओम शांति ओम’, ‘एक हसीना थी, एक दीवाना था’, ‘तू कितने बरस की, तू कितने बरस का’, यांसारख्या अफलातून गाण्यांचा समावेश या एकाच चित्रपटात होता, जे आजही खूप लोकप्रिय आहे. याचे संगीत दिग्दर्शित हे लक्ष्मीकांत प्यारेलाल हे होते, ज्यांनी सर्वोत्तम संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कारही जिंकला होता.

हरजाई (१९८१)
रमेश बहल दिग्दर्शित ‘हरजाई’ हा चित्रपट सन १९८१ साली टीना आणि रणधीर कपूर यांच्या जोडीसह रिलीझ झाला होता. या चित्रपटात रणधीर कपूर यांची ‘अजय’ ही भूमिका खूप कॉमेडी होती आणि ते आपल्या मित्रांना आश्चर्यचकित करण्याच्या नादात स्वत:लाच कँसरग्रस्त म्हणवतात. त्यामुळे टीनाने साकारलेली भूमिका ‘गीता चोप्रा’ ही त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करते आणि त्यांच्यावर प्रेम करू लागते. तरीही, त्यानंतर अजयला खरोखरंच कॅन्सर होतो आणि दोन्ही कुटुंबामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होते. या चित्रपटात रणधीर आणि टीना यांच्याव्यतिरिक्त शम्मी कपूर आणि माला सिन्हा हेदेखील मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची खूप प्रशंसा करण्यात आली.

कातिलों के कातिल (१९८१)
सन १९८१ मध्ये रिलीझ झालेल्या ‘कातिलों के कातिल’ या ऍक्शन थ्रिलर चित्रपटात दिग्गज कलाकार, धर्मेंद्र, ऋषी कपूर, जीनत अमान, टीना, निरुपा रॉय, शक्ती कपूर आणि अमजद खान हे मुख्य भूमिकेत होते. अर्जुन हिंगोरानी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटातील मोठ-मोठ्या कलाकारांच्या उपस्थितीमुळे हा चित्रपट सुपरहिट ठरला. हा चित्रपट विशेषत: आपल्या संगीत आणि ब्रूसली सारख्या दिसणाऱ्या एका कलाकाराच्या विशेष कपड्यांसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे, हे पात्र एक स्त्री आणि जंगली अस्वलाच्या संभोगातून जन्मले होते.

रॉकी (१९८१)
दिग्गज अभिनेता संजय दत्त याने जेव्हा आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती, तेव्हा तो आपल्या पहिल्या ‘रॉकी’ या चित्रपटात टीना मुनीमसोबत दिसला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी केले होते. या चित्रपटात टीना आणि संजय दत्तव्यतिरिक्त रीना रॉय, अमजद खान, राखी, रंजीत, शक्ती कपूर आणि अरुणा इराणी हेदेखील मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट संजय दत्तची आई नर्गिसच्या निधनानंतर काही दिवसांनी चित्रपटगृहांमध्ये रिलीझ करण्यात आला. या चित्रपटाने खूप नाव कमावले. संजय दत्त आणि टीना मुनीमच्या प्रेम संबंधांच्या चर्चाही याच चित्रपटापासून सुरू झाल्या होत्या. प्रेक्षकांनी या जोडीला पडद्यावर भरपूर पसंत केले आणि या जोडीनेही एकमेकांना पसंत केले होते.

राजपूत (१९८२)
विजय आनंद दिग्दर्शित सन १९८२ साली रिलीझ झालेल्या ‘राजपूत’ या चित्रपटात टीना धर्मेंद्र, राजेश खन्ना, हेमा मालिनी आणि रंजिता कौरसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. टीनाने ‘जया’ची भूमिका साकारली होती, जी चित्रपटाच्या कहाणीमध्ये बाहेरून शिकून आलेली एक मुलगी आहे. तिला आपल्या इकडच्या पद्धती काहीच माहिती नसतात. तरीही, जेव्हा जयाला समजते की, तिचे वडील हे चांगले व्यक्ती नाहीत, तेव्हा ती आपल्या वडिलांशी नाते तोडते. जया विनोद खन्नाने साकरलेल्या ‘भानु प्रताप सिंग’शी प्रेम करत असते आणि त्याची साथ देते. या चित्रपटातही मोठ-मोठ्या कलाकारांचा समावेश होता. त्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीस खूप वेळ लागला.

ये वादा रहा (१९८२)
टीना मुनी यांनी पुन्हा एकदा ऋषी कपूरसोबत कपिल कपूर दिग्दर्शित ‘ये वादा रहा’ चित्रपटात दिसली. या चित्रपटात टीना आणि ऋषी कपूरसोबत ‘पूनम ढिल्लन’, ‘शम्मी कपूर’, ‘राखी गुलजार’, ‘राकेश बेदी’ आणि ‘इफ्तेखार’ मुख्य भूमिकेत होते. ही कहाणी ऋषी कपूर साकारत असलेल्या विक्रम आणि पूनम ढिल्लन साकारत असलेल्या सुनिताची असते, जे एकमेकांशी खूप प्रेम करत असतात. यादरम्यान एका अपघाताने पहिली सुनिताला मोठी दुखापत होते आणि तिची प्लास्टिक सर्जरी होते. अशाप्रकारे नवीन चेहऱ्यासह टीना सुनिताची भूमिका साकारते.

वाँटेड- डेड और अलाइव्ह (१९८४)
मोठ-मोठ्या चित्रपटांचा भाग बनण्याची संधी मिळाली, तेव्हा टीना मुनीमला थोडा अहंकार चढला होता. त्यामुळे तिने दिग्गज अभिनेता मिथून चक्रवर्तीला बी ग्रेडचा अभिनेता समजून त्यांच्यासोबत काम करण्यास नकार दिला होता. जेव्हा अंबरिश संगल दिग्दर्शित ‘वाँटेड- डेड और अलाइव्ह’ चित्रपट बनला, तेव्हा मिथूनला मुख्य भूमिका मिळाली आणि त्यांच्यासोबत टीना मुनीमला साईन करण्यात आले.

आखिर क्यों (१९८५)
टीना मुनीमने राजेश खन्ना यांच्यासोबत ‘सौतन’, ‘बेवफाई’, ‘सुराग’, ‘इंसाफ मैं करूंगा’, ‘अलग- अलग’, ‘अधिकार’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यातील एक म्हणजे ‘आखिर क्यों’. राजेश आणि टीना यांच्या जोडी खऱ्या आयुष्यातही खूप चर्चेत होती. जे ओम प्रकाशच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘आखिर क्यों’ चित्रपटात टीनाने इंदू शर्माची भूमिका साकारली होती. इंदू एक साधारण मुलगी असते आणि ती एका कबीर नावाच्या मुलाशी म्हणजेच राकेश रोशनशी प्रेम करत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न

हे देखील वाचा