अनेक टेलिव्हिजन मालिका आणि चित्रपटातून आपल्या अभिनयाचा डंका मिरवणारी मराठी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) होय. उत्तम संवादकौशल्य, देहबोली आणि उत्कृष्ट सूत्रसंचालन यामुळे स्पृहाला मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगलीच ओळख मिळाली आहे. अनेक मालिका आणि चित्रपटासोबत तिने काही शोचे सूत्रसंचालन देखील केले आहे. या सोबतच स्पृहा सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांना देखील ती खुश करत असते.
अभिनेत्रीने तिचे एक यूट्यूब चॅनल सुरु केले आहे, ज्याच्या माध्यमातून ती चाहत्यांचे मनोरंजन तर करतेच, सोबतच त्यांना अनेक गोष्टींसाठी प्रोत्साहित करते, जागरूक करते. ती तिच्या चॅनेलवर कविता वाचन, आवडलेल्या पुस्तकाबद्दल माहिती आदी अनेक गोष्टी करते. स्पृहाच्या या सर्व व्हिडिओंना चांगलाच प्रतिसाद देखील मिळतो. यावेळी तिने पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती एकटी नसून, तिचा मित्र देखील दिसत आहे. या व्हिडिओमध्ये स्पृहाने तिने स्वतः लिहलेली कविता चाहत्यांना वाचून दाखवली आहे.
कविता ऐकवताना स्पृहा म्हणते….
“अचानक कसं सगळं शांत शांत होतं, अचानक कसं सगळं शांत शांत होतं,
श्वास रोखून धरतं, सूर्यबिंब बुडत बुडत जातं,
किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा, किनाऱ्यावर येत राहतात लयदार लाटा
उन्हामधून शोधत राहतात, ढग वेगळ्या वाटा |
नारंगी सोनेरी होतं केशराचं पाणी, नारंगी सोनेरी होतं केशराचं पाणी
भरतीच्या आवेगाला वेदनेची गाणी,
वाळू सरकत जाते आणि पावलं भिजत राहतात, समुद्राचा कण अन् कण शोषूण घेऊ पाहतात,
आपल्या आत वाजत राहते हळुवार गाज, अंधारावर चढत जातो चांद्रवरखी साज
नक्की कोण असतो आपण अशावेळी खरंच?
आता इथे एकटे आहोत, तेही एकभरच |”
स्पृहाने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यानंतर तिने चित्रपटात प्रवेश केला तिने ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’, ‘उंच माझा झोका’, ‘प्रेम हे’ या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबतच तिने ‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’, ‘पैसा पैसा’, ‘ए पेइंग घोस्ट’, ‘देवा’, ‘बाबा’, ‘मोरया’, ‘स्माईल प्लिज’ या चित्रपटात काम केले आहे.
हेही वाचा –