×

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या ‘या’ गाण्याने लावले सगळ्यांना वेड

आज सगळीकडे महाशिवरात्रीचा सण मोठ्या आनंदाने आणि भक्तीभावाने साजरा केला जात आहे. भगवान शंकराची उपासना करण्याचा, भक्ती करण्याचा आणि देवाला प्रसन्न करण्याचा दिवस म्हणून आजच्या दिवसाचे महत्व असते. त्यामुळे सगळीकडे भक्तीमय वातावरण तयार झाले असताना भोजपुरी अभिनेता खेसारी लाल यादवचे (Khesari Lal Yadav) नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. भगवान शंकराचे भक्तीगीत असलेल्या या गाण्याने सगळीकडेच चर्चा मिळवली आहे.

कोणताही सण असो किंवा उत्सव असो भोजपुरी कलाकार आपले गाणे घेऊन यायला कधीच विसरत नाहीत. त्यामध्ये खेसारी लाल यादवचे नाव आघाडीवर असते. खेसारी लाल यादव हा भोजपुरी चित्रपट जगतातील प्रसिद्ध गायक, अभिनेता म्हणून ओळखला जातो. खेसारी लालचे येणारे प्रत्येक गाणे सुपरहिट होत असते ही त्याची खास ओळख आहे. आता खेसारी लालने महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर त्याचे एक नवीन गाणे प्रदर्शित केले आहे. ‘मन मगन मगन शिव में’ असे या गाण्याचे नाव असून सध्या हे गाणे सगळीकडे तुफान व्हायरल होत आहे.

खेसारी लाल यादवचे हे नवीन गाणे प्रत्येकाला वेड लावत आहे. त्याच्या ‘आशिकी’ या चित्रपटातील हे गाणे 26 फेब्रुवारीला प्रदर्शित झाले होते. भगवान शंकराच्या भक्तिवर आधारित असे हे गाणे आहे. गाण्याला डीजे संगीत दिल्याने प्रत्येकजण यावर थिरकताना दिसत आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून गाण्याला आत्तापर्यंत असंख्य लोकांनी पाहिले आहे. हे गाणे Enterr१० रंगीला या यू ट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे. गाण्यातील खेसारी लालच्या डान्सवर सगळेच फिदा झाले आहेत. त्यामुळेच हे गाणे सगळीकडे धमाल करताना दिसत आहे. ‘आशिकी’ चित्रपटात खेसारी लाल यादव, आम्रपाली दुबे, काव्या सिंग, प्रकाश जयस्वाल आणि श्रुती राव असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत. हा चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Latest Post