Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड ‘नाहीतर तुझा असा बॅंड वाजवेल की…’ रितेश कुमारने दिली सोशल मीडियावर राखी सावंतला धमकी

‘नाहीतर तुझा असा बॅंड वाजवेल की…’ रितेश कुमारने दिली सोशल मीडियावर राखी सावंतला धमकी

राखी सावंतपासून वेगळे झाल्यानंतर तिचा पती रितेश कुमारने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या पत्नीला धमकी दिली आहे. त्याने धमकी दिली आहे की, तो तिला रिऍलिटी शोमध्ये घेणार नाही. रितेशने राखी सावंतला ज्या प्रकारे चेतावणी दिली आहे, ते पाहून सगळेच हैराण झाले आहेत. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर रितेश कोणत्याही वादात आला नाही, तसेच त्याने राखीबाबत कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नाही. परंतु आता अशाप्रकारे त्याची पोस्ट पाहून आता सगळेजण असा अंदाज लावत आहेत की, तो राखीवर खूप नाराज आहे.

रितेशने त्याच्या पोस्टमध्ये यूट्यूब लिंक पोस्ट केली आहे. यात राखी सावंत रितेशला रिऍलिटी शो लॉकअपसोबत संपर्क करण्याबाबत दिसत आहे. रितेशने लिहिले की, “राखी जी एक साधा सल्ला आहे. कोणत्याही रिऍलिटी शोमध्ये तुम्ही माझ्या समोर येऊ नका. नाहीतर तुझा असा बॅंड वाजवेल की, तू पुन्हा कोणत्याही शोमध्ये जाणार नाही. बिग बॉसमधील एका वाईल्ड कार्डची काय अवस्था केली होती हे आठवतच असेल. सो जस्ट कूल.”

https://www.instagram.com/p/Cah3igVvSRR/?utm_source=ig_web_copy_link

राखी सावंतने (rakhi sawant) रितेशच्या या पोस्टला कमेंट केली आहे की, “तुझा हा ड्रामा बंद कर.” यावर त्याने उत्तर दिले आहे की, “ड्रामा क्वीन तर तुम्ही आहात मॅडम.” यावर राखी शांत बसली नाही तर तिने रितेशला चेतावणी दिली आहे की, पुन्हा माझ्या फोटो वापर करायचा नाही. परंतु रितेशचे असे मत आहे की, राखीने त्याचे नाव घेऊन मीडिया समोर बोलले नाही पाहिजे.

‘बिग बॉस १५’ मध्ये राखी सावंतने रितेशसोबत एन्ट्री केली. तेव्हा तिने तो तिचा पती आहे असे नॅशनल टीव्हीवर सांगितले. परंतु कोणालाही विश्वास बसला नाही. सगळेजण असे म्हणत होते की, तो या शोचा कॅमेरामॅन आहे आणि राखीने केवळ लोकप्रियतेसाठी हे सगळं केलं आहे. शोच्या बाहेर आल्यावर काही दिवसातच त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा :

हे देखील वाचा