Sunday, February 23, 2025
Home मराठी पूजा सावंत आणि भूषण प्रधान यांच्या अफेअरला लागला पूर्णविराम, ‘ही’ आहे अभिनेत्याची खरी गर्लफ्रेंड

पूजा सावंत आणि भूषण प्रधान यांच्या अफेअरला लागला पूर्णविराम, ‘ही’ आहे अभिनेत्याची खरी गर्लफ्रेंड

मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम अभिनेता भूषण प्रधान हा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याचे वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य असो त्याच्याबाबत तो नेहमीच त्याच्या चाहत्यांना माहिती देत असतो. त्याच्या चाहत्यांना देखील त्याच्याबाबत जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. भूषण अनेकवेळा त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असतो. त्याचे नाव संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, भाग्यश्री लिमये या अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते.

या सगळ्यात पूजा सावंतसोबतच्या त्याच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच ऐकू येत होत्या.‌ अनेकवेळा त्याचे रोमँटिक फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे ते दोघे लग्न करणार आहेत. अशा देखील अफवा पसरल्या होत्या. परंतु आता या सगळ्या अफवांवर पूर्णविराम लागला आहे. कारण भूषणने त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Bhushan Pradhan share her real girlfriend photos on social media)

भूषण प्रधानच्या गर्लफ्रेंडचे नाव वैशाली महाजन हे आहे. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार त्याच्या या फोटोवर कमेंट करून शुभेच्छा देत आहेत.

वैशालीने रचना संसद कॉलेजमधून फाईन आर्ट्सचे शिक्षण घेतले. गेल्या ५ वर्षापासून ती आर्ट डायरेक्टर म्हणून जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहे. कामा निमित्त त्यांचं भेट झाली. नंतर त्या दोघांची चांगली मैत्री आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांची जोडी सगळ्यांना खूप आवडत आहे. आता ते दोघे कधी लग्न करणार आहेत याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

भूषण हा देखील मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘तू तिथे असावी’, ‘पारंबी’, ‘अजिंक्य’, ‘शिगमा’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच त्याने अनेक मालिकांमध्ये काम करून त्याने लोकप्रियता मिळवली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा