HBD : आयुष्यात एकदाही कोर्टाची पायरी न चढलेल्या सौरभ शुक्ला यांनी ‘जॉली एलएलबी’मध्ये काम करून जिंकले पुरस्कार

‘सत्या’, ‘जॉली एलएलबी’, ‘पिके’, यांसारख्या चित्रपटात काम करून ओळख बनवणारे दिग्दर्शक आणि स्क्रीन रायटर म्हणजे सौरभ शुक्ला. त्यांनी अभिनय देखील केला आहे. यातून त्यांनी त्यांची खास ओळख बनवली आहे. अशातच शनिवारी (५ मार्च ) रोजी ते त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत काही खास माहिती..

सौरभ शुक्ला (saurabh shukla) यांचा जन्म ५ मार्च १९६३ साली उत्तरप्रदेशमध्ये गोरखपूर येथे झाला. सौरभ शुक्ला यांच्या घरात संगीतमय वातावरण होते. त्यांची आई जोगमाया भारताची पहिली महिला तबला वादक होत्या. तसेच वडील शत्रुघ्न शुक्ला हे आगाराचे प्रसिद्ध गायक होते. ते जेव्हा दोन वर्षाचे होते, तेव्हा त्यांचे संपूर्ण कुटुंब दिल्ली येथे स्थलांतरित झाले. त्यांच्या आई वडिलांना संगितासोबत चित्रपट पाहण्याची खूप आवड होती. दिल्लीमध्ये लहानाचे मोठे झालेले सौरभ शुक्ला यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर थिएटरमधून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. त्यांना सुरुवातीला शेखर कपूर यांच्या बंडी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. चित्रपट आणि टेलिव्हिजनवर काम करता करता त्यांना राम गोपाल वर्मा यांच्या सत्या चित्रपटातून ओळख मिळाली.

‘सत्या: चित्रपटात कल्लू मामा हे पात्र सगळ्यांना एवढे आवडले की, सगळेजण त्यांना त्याच नावाने ओळखतात लागले. या चित्रपटातून नाव तर मिळाले परंतु याचा त्यांना काही खास फायदा झाला नाही. यानंतर त्यांना ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटात काम मिळाले आणि यानंतर त्यांना यश मिळण्यास सुरुवात झाली.

‘जॉली एलएलबी’ चित्रपटात ‘जस्टिस सुंदरलाल त्रिपाठी’चा रोल सगळ्यांना खूप आवडला. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीत सौरभने सांगितले होते की, “जजच्या रोलने त्यांना खूप ओळख मिळाली. या पात्रासाठी त्यांचे खूप कौतुक झाले. परंतु वैयक्तिक आयुष्यात मी कधीही कोर्टात गेलो नाही. हे पात्र जर त्यांनी नीट निभावले असेल तर यामध्ये दिग्दर्शक सुभाष कपूर यांचा मोठा हात आहे. त्यांनी मला आधी सगळी कहाणी सांगितली त्यामुळे मी हे पात्र नीट निभावू शकलो.”

सौरभ शुक्ला यांना ‘जॉली एलएलबी’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून नॅशनल पुरस्कार मिळाला. तसेच त्यांनी इंटरनॅशनल चित्रपट ‘स्लॅमडॉग करोडपती’ या चित्रपटात देखील काम केले आहे. यासाठी त्यांना गोल्डन अवॉर्ड आणि अकॅडमी अवॉर्ड देखील मिळाला आहे.

हेही वाचा :

 

Latest Post