Saturday, April 20, 2024

रणदीप हुड्डाला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, अभिनेत्याच्या गुडघ्यावर झाली शस्त्रक्रिया

रणदीप हुड्डा अनेक वर्षांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. परंतु त्याच्या नावावर काही निवडक चित्रपट आहेत. मात्र त्याने ज्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. रणदीप लाइमलाइटपासून थोडा दूर असला तरी तो सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतो. नुकतीच एक बातमी समोर आली आहे, ज्याने त्याचे चाहते चांगलेच चिंतेत पडले आहेत. रणदीपला १ मार्च रोजी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात त्याने कोणतीही माहिती दिली नसली तरी आता त्याच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, आता तो पूर्णपणे धोक्याबाहेर असल्याची बातमी समोर आली आहे. होय, हे निश्चित आहे की तो काही काळ घरी विश्रांती घेईल जेणेकरून तो त्यातून पूर्णपणे बरा होईल.

माध्यमांतील वृत्तानुसार, गुरुवारी (३ मार्च) अभिनेता रणदीप हुड्डाच्या (Randeep Hooda) गुडघ्यावर मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. इन्स्पेक्टर अविनाश या आगामी ओटीटी मालिकेसाठी ऍक्शन सीनचे शूटिंग करत असताना ही दुखापत झाली. रणदीपने दुखापतीसाठी काही औषधे घेतली होती. तत्पूर्वी, त्याने त्याचा सहकारी अभिनेता, अमित सियाल याच्यासोबत चालू असलेला ऍक्शन सीन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.

‘राधे’च्या शूटिंगदरम्यान झाली होती दुखापत

ही तीच गुडघ्याची दुखापत आहे जी रणदीपला २०२१ साली सलमान खान अभिनित ‘राधे’ या चित्रपटाच्या ऍक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान झाली होती. आता, अभिनेत्याला अखेर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कारण तो पॅपराझीला हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसला होता.

रणदीप हुड्डाने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, २००८ मध्ये त्याच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. खरं तर, पोलो खेळादरम्यान, त्याचा घोडा घसरला आणि त्याच्या पायावर पडला. त्यामुळे त्या वेळी त्याच्या पायाच्या हाडांना आधार देण्यासाठी प्लेट्स आणि नट बसवण्यात आले होते. ही प्लेट वर्षभरात काढायची होती, मात्र १२ वर्षे उलटूनही त्यांनी ती काढली नाही, त्यामुळे त्याच्या पायात इन्फेक्शन झाले आणि यामुळे २०२० मध्ये त्याच्या पायाची शस्त्रक्रिया झाली.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर रणदीपच्या पुढे एक मनोरंजक लाइनअप आहे. त्याने अलीकडेच त्याच्या आगामी नेटफ्लिक्स ऑरिजिनल कॅटमधील त्याचा पहिला लूक उघड केला होता. इतकंच नाही, तर तो इलियाना डिक्रूझसोबत त्याचा आगामी चित्रपट ‘तेरा क्या होगा लव्हली’मध्येही दिसणार आहे.

हेही वाचा –

हे देखील वाचा