Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

हँडसम उमेश कामतचा रावडी लूक पाहिला का? चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स

मनोरंजनविश्वात वावरताना कलाकरांना त्यांच्या लुक्सबद्दल खूपच सजग राहावे लागते. सतत कलाकारांवर मीडियाचे कॅमेरे रोखलेले असल्याने त्यांना त्यांच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीची खूपच काळजी घ्यावी लागते. आता या ग्लॅमर जगात राहताना कलाकरांना सतत त्यांच्या लूकवर वेगवेगळे प्रयोग करावे लागतात. कधी कधी आपल्या कामाचा एक भाग म्हणून तर कधी कधी कलाकार स्वतःहून त्यांच्या लूक्समध्ये काही बदल करताना दिसतात. सोशल मीडिया आल्यापासून जेव्हा कलाकार एका वेगळ्या रूपात येतात तेव्हा ते त्यांचा नवीन लूक आपल्या सोहळा मीडिया अकाऊंटवरून फॅन्ससोबत शेअर करतात. आपल्या आवडत्या कलाकारांना नवीन रूपात बघते फॅन्ससाठी देखील खास असते. जेव्हा कलाकार अशा काही नवीन रूपातील फोटो शेअर करतात तेव्हा फॅन्स देखील त्यांच्या त्या पसोट प्रतिक्रिया देताना दिसतात. असे काहीसे झाले आहे मराठी मनोरंजनविश्वातील चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमेश कामतबद्दल.

मराठी मनोरंजनसृष्टीतील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून उमेश ओळखला जातो. मालिका, चित्रपट, नाटकं अशा तिन्ही माध्यमातून त्याने त्याच्या अभिनयाने स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केले आहे. उमेश नेहमीच त्याच्या फिटनेसची आणि लुक्सची विशेष काळजी घेताना दिसतो. अशातच आता उमेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या नवीन रूपातील एक फोटो शेअर केला आहे (umesh kamat new look). या फोटोमध्ये उमेशने त्याच्या लूकवर नवीन प्रयोग केलेला दिसत आहे. उमेशने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो चक्क मिशीमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करत उमेशने कॅप्शनमध्ये लिहिले, “कसा आहे माझा लुक?”

उमेशचा हा नवीन लूक पाहून त्याच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. कुणी लयभारी तर कुणी कमाल..बहार तर आणखी एकानं म्हटलं आहे की, चिकना म्हणत हार्ट इमोजी पोस्ट केली आहे. कोणी त्याचा हा लूक विश्वास नांगरे पाटील यांच्या बायोपिकसाठी योग्य असल्याचे सांगितले आहे. यासोबतच कलाकारांनी देखील त्याच्या लूकवर कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे. मात्र या सर्वांमध्ये एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आहे. त्या कमेंटमध्ये लिहिले आहे की, “वीना मिशीचाच cute दिसतोस”

उमेशने आतापर्यंत कायद्याचे बोला, अजब लग्नाची गजब गोष्ट, धागेदोरे, लग्न पाहावे करून, टाईम प्लिज, ये रे ये रे पैसे, असेही एकदा व्हावे आदी चित्रपटांमध्ये तर आभाळमाया, वादळवाट, असंभव, एका लग्नाची तिसरी गोष्ट, शुभंकरोती आदी मालिकांमध्ये काम केले आहे. याशिवाय त्याने रणांगण, सोनचाफा, इन्व्हेस्टमेंट, दादा एक गुड न्यूज आहे, गांधी आडवा येतो आदी उत्कृष्ट नाटकांमधून भूमिका साकारल्या आहे. त्याची ‘आणि काय हवं’ ही सिरिजदेखील तुफान गाजली. सध्या तो सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत दिसत आहे.

हेही वाचा 

हे देखील वाचा