Wednesday, April 17, 2024

जया बच्चन यांनी केली अमिताभ बच्चन यांच्या दाढीची चेष्टा, कधीही न पाहिलेला व्हिडिओ आला समोर

बच्चन परिवारातील छोटे छोटे किस्से ऐकण्यासाठी त्यांचे चाहते खुपच उत्सुक असतात. सोशल मीडियावर काही दिवसांपासुन एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सिमी ग्रेवालने यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिमी ग्रेवाल त्या काळातील टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अँकर होत्या. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये प्रत्येक कलाकाची मुलाखत घेतली आहे. हा व्हिडिओ एका मुलाखती दरम्यानचा बीटीएसचा आहे. त्यांच्या टॉक शोमध्ये रेखापासून ते प्रियंका चोप्रा, सैफ आणि अमृतापासून ते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या परिवारातील इतर लोकही दिसले आहेत. सिमी ग्रेवालने अमिताभ बच्चन आणि त्यांच्या परिवारतील कधीही न बघितलेला एक मजेशीर व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.त्या रोज काहीतरी त्याच्या जुन्या आठवणीला उजाळा देणारे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

या व्हिडिओत जया बच्चन आणि त्यांचे मुले श्वेता बच्चन नंदा आणि अभिषेक बच्चन एका व्हिडिओत बिग बींच्या दाढीची खिल्ली उडवताना दिसत आहेत. सिमी ग्रेवालने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहले आहे की, “माझ्या आवडत्या मिलनचे क्षण, चार-शॉटसाठी बच्चन परिवारला एकत्र करणं कठीण होत. ही तर फक्त सुरूवात आहे व्हिडिओ अजून बाकी आहे.”

व्हिडिओमध्ये सिमी म्हणतात शोमध्ये येउन चार चांद लावले त्याबद्दल धन्यवाद बच्चन परिवारचे आभार मानताना त्या दिसत आहेत. पुढे त्या म्हणतात की, “चांगली गोष्ट ही आहे की, सर्व काही व्यवस्थित पार पडले.” अमिताभ बच्चन यांनी यावर मजेशीर उत्तर दिले आहे. “जेव्हा ही हा शो तुम्हाला सोडावासे वाटले तेव्हा मी हाताळेन. मी दिड वर्ष टेलिव्हिजनवर काम केले आहे. मला फक्त पांढरे कपडे घालावे लागतील.” यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या दाढीची देखील खिल्ली उडवली. त्यावेकी तिथे उपस्थित असलेले सगळे हसून हसून लोटपोट झाले.

हेही वाचा

‘अनुपमा’च्या ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीने अचानक सोडला शो, इंडस्ट्री सोडून गेली ‘या’ वाटेवर

‘द काश्मीर फाइल्स’ रिलीझ होणार का? मुंबई उच्च न्यायालयाने दिला मोठा निर्णय

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना बुडाले शोकसागरात, आवडता जीव कायमचा हरपला

हे देखील वाचा