×

महिला दिनी एली अवरामने दिले खास सरप्राइज, प्रेक्षकांच्या भेटीला आणले एक नवे कोरे गाणे

एली अवराम ही तिच्या अभिनयामुळे आणि डान्स मुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. अशातच एक गायिका म्हणून तिचे पहिले गणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. तिने हे गाणे महिला दिनी प्रदर्शित केले आहे. ‘कुडी मैं मीन’ तिचे हे गाणे प्रदर्शित झाले आहे. दोन महिला ज्या स्वतंत्र आहेत आणि त्यांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यावर विश्वास आहे. अशी कहाणी या व्हिडिओमधून दाखवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील हे गाणे खूप आवडले आहे.

‘कुडी मैं मीन’कडून दर्शक या गोष्टीची अपेक्षा करत आहेत की, हे गाणे सेल्फ लव्ह, सेल्फ वर्थ आणि ऍटिट्यूडवर आधारित आहे. हे गाणे पहिल्या लॉकडाउन दरम्यान तयार झाले आहे. परंतु एली हे गाणे प्रदर्शित करण्याची योग्य वेळ शोधत होती. हे गाणे महिलांवर आधारित आहे. म्हणून तिने हे गाणे महिला दिनी प्रदर्शित केले. (Eli avrram and avina Shah new song kudi main mean went viral)

एली अवरमने तिच्या डान्सने सगळ्यांना प्रभावित केले आहे. अशातच तिने तिच्या या हिडेन टॅलेंटने सगळ्यांना सरप्राइज दिले आहे. या गाण्यात ती ग्लॅमरस आणि स्ट्रिल लूकमध्ये दिसत आहे. तिचा हा लूक आदित्य रॉय कपूर आणि दिशा पटानी यांच्या ‘मलंग’ या चित्रपटाची आठवण करून देतो.

एली एवरामने आमिर खानसोबत ‘हर फन मौला’ या गाण्यावर देखील डान्स केला आहे. तिला भारताच्या फायनेस्ट डान्स टॅलेंट पैकी एक मानले जाते. खास गोष्ट म्हणजे ‘कुडी मैं मीन’ या गाण्याचे बोल देखील एलीने लिहिले आहे. तसेच गाण्यातील मुव्ह्स देखील तिने स्वतः कोरीओग्राफ केले आहेत. तिने तिच्या स्टाईलमध्ये हे गाणे केले आहे. यातून ही गोष्ट समजत आहे की, ती एक मल्टी टॅलेंटड अभिनेत्री आहे आणि मल्टी टास्किंग वूमन आहे.

यावर एली एवरामने सांगितले की, “हे काही असे आहे जे मी मला खूप दिवसापासून करायचे होते. अविनाने मला हे सगळं व्यक्त करण्यासाठी प्रेरित केलं. एक क्रिएटिव्ह आर्टिस्ट म्हणून मला डान्सिंग, सिंगिंग, परफॉर्मिंग आणि गाणे बनवण्यासाठी मला प्रेरित केले. मला देखील त्यात मजा आहे.” अशाप्रकारे तिने तिचे मत व्यक्त केले आहे. अशातच तिचे हे नवीन गाणे सगळ्यांना खूप आवडले आहे.

हेही वाचा :

Latest Post