सोशल मीडियामुळे आजकाल काहीही होणं शक्य आहे. सोशल मीडियामध्ये एवढी ताकद आहे की, ती माणसाला रंकवरून राजा बनवू शकते. अल्पावधीतच सामान्य लोक जगभर प्रसिद्ध होतात. पुन्हा एकदा असंच काहीसं पाहायला मिळत आहे. केरळमधील एका मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.
वास्तविक संपूर्ण प्रकरण असे आहे की, केरळची रहिवासी असलेली किसबू ही फुगे विकायची. अर्जुन कृष्णन नावाच्या एका फोटोग्राफरने तिला पाहिले आणि त्याने किसबूचे काही फोटो क्लिक केले. अर्जुनने क्लिक केलेले फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे आता मोठ्या प्रणामावर व्हायरल होत आहेत. (kerala baloon seller girl kisbu makover photos creating buzz on social media people goes crazy)
या फोटोमध्ये किसबूचा साधेपणा स्पष्टपणे दिसत होता, त्यामुळेच हा फोटो व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. एका मुलाखतीत अर्जुन कृष्णनने सांगितले की, त्याने किसबूला १७ जानेवारीला अंदलूर कावू महोत्सवात फुगे विकताना पाहिले होते. तिचे सौंदर्य आणि साधेपणाने त्याला इतके प्रभावित केले की, त्याने तिचा फोटो काढला. त्याने हे देखील सांगितले की, फोटो क्लिक केल्यानंतर त्याने किसबू आणि त्याच्या आईला देखील दाखवले. त्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
किसबूचा फोटो व्हायरल होताच, मेकअप आर्टिस्ट रेम्या प्राजुलने तिच्याशी संपर्क साधला आणि किसबूच्या मेकओव्हरबद्दल बोलली. आता किसबूच्या मेकओव्हरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती सुंदर आणि पूर्णपणे वेगळी दिसत आहे. या फोटोशूटमध्ये किसबूने पारंपरिक कासवू साडी नेसलेली आहे आणि तिने सोन्याचे दागिने घातलेले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










