Friday, March 14, 2025
Home कॅलेंडर ‘या’ गोष्टीची आमिर खानला आयुष्यात वाटते सर्वात जास्त भीती, मुलाखतीत केला खुलासा

‘या’ गोष्टीची आमिर खानला आयुष्यात वाटते सर्वात जास्त भीती, मुलाखतीत केला खुलासा

बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान हा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामध्ये खूप चर्चेत असतो. तो मंगळवारी (14 मार्च) रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की, आमिर खानने त्याच्या आयुष्यात खूप यश मिळवले आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर सगळ्यांना प्रभावित केले आहे. त्याचा प्रत्येक चित्रपट हा ब्लॉकबस्टर होत असतो. अशातच त्याने दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यात त्याला सर्वात जास्त कशाची भीती वाटते हे सांगितले आहे.

आमिर खानने (Aamir khan) सांगितले की, “माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भीती म्हणजे शा एका व्यक्तीला गमावणे जी माझ्या खूप जवळ आहे आणि आयुष्यभर हीच माझी माझे सर्वात मोठी भीती असणार आहे. कोव्हड काळात मी याच भीती सोबत जगत होतो. माझ्या जवळच्या लोकांपासून माझे हे विचार चालू झाले.” (Aamir Khan reveals his biggest fear of his life)

Aamir-Khan
photo Courtesy Instagram amirkhanactor

आमिर खानने पुढे सांगितले की, “जेव्हा मी 18 वर्षाचा होतो, तेव्हापासून मी काम करण्यास सुरुवात केली. एक सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम करण्यास सुरुवात केली. 18 वर्षापासून ते आतापर्यंत मी या फिल्डमध्ये स्वतःला झोकून काम केले आहे. ही चांगली गोष्ट आहे. परंतु तुमच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्ही पूर्ण केल्या पाहिजे. मग तुम्ही तुमची फॅशन फॉलो केली पाहिजे.”

Photo Courtesy Instagrampaanifoundation

त्याने पुढे सांगितले की, “ज्या प्रकारे मला कुटुंबाला वेळ द्यायला पाहिजे होता. तो मी देऊ शकला नाही. मग कदाचित तुम्ही असे देखील म्हणू शकता की, मी फक्त माझा विचार करत होतो. सुरुवातीला मला खूप कष्ट करावे लागले. जर सुरुवातीचे दोन तीन वर्ष तुम्ही मेहनत घेतली तर नंतर तुमचे आयुष्य सेट होऊन जाते. जर पुढे 30 वर्षापर्यंत तुम्ही हेच केले, तर ही खूप चांगली गोष्ट आहे.” अशाप्रकारे त्याने त्याचा अनुभव मांडला आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ

अमृता फडणवीस यांच्या खांद्यावर बसलेल्या पोपटाने वेधलं लक्ष, त्याची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा