अभिनेत्री सनी लिओनी ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा लाखोंमध्ये चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तिचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. परंतु जरा विचार करा जर सनी खरंच या चाहत्यांना भेटायला गेली तर तिचे चाहते किती वेड होतील. असे नुकतेच घडले आहे. सनी नुकतेच एका ठिकाणी स्पॉट झाली आहे. त्यावेळी तिच्या चाहत्यांनी घोळका घातला. सनीला पाहून सगळ्यांचे भाव हरपले आणि सगळे मोठमोठ्याने ओरडू लागले. तिचा हा व्हिडिओ स्वतः सनीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
सनीने (sunny leone) शेअर केलेल्या या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सनी बाहेर येताच रस्त्याच्या रस्त्याच्या बाजूला तरुण वर्ग दिसत आहे. अनेक मुले मुले मोठ्याने सनीचे नाव घेऊन ओरडताना दिसत आहेत. कॅमेरा मॅन, तिथे सनी चे फोटो काढताना दिसत आहेत. तसेच तिचे बॉडी गार्ड गर्दी कमी करण्याच्या प्रयत्न करत आहेत.
सनी एका ठिकाणी शूटींगसाठी गेली होती. एका फार्म हाऊसवर ती राहिली होती. त्यावेळी तेथील नागरिकांना सनी तिथे असल्याची माहिती समजली आणि त्यांनी तिला पाहण्यासाठी गर्दी केली. सनी बाहेर पडताच चहुबाजूने तिला सगळ्यांनी घेरले आणि आणि मोठ्याने ओरडू लागले. हे पाहून सनीचे फॅन फॉलोविंग बद्दल अंदाज येतो.
सनी लिओनीबद्दल बोलायचे झाले, तर बॉलिवूड व्यतिरिक्त ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे आणि साउथ इंडस्ट्रीमध्येही ती आपली उपस्थिती नोंदवत आहे. ती मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘हेलन’, ‘कोका कोला’ आणि ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सारखे चित्रपट करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –