दाक्षिणात्य अभिनेता राम चरणने ‘आरआरआर’च्या युक्रेनियन क्रू मेंबर्सना केली आर्थिक मदत

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अतिशय हँडसम आणि सुपरस्टार असलेला अभिनेता म्हणजे राम चरण होय. या वडिलांच्या म्हणजेच चिरंजीवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तो देखील या क्षेत्रात आला. त्याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या जोरदार अभिनयाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. युक्रेन आणि रशिया यांच्यातील परिस्थिती आज किती बिघडली आहे, याची जाणीव पूर्ण जगाला आहे. जगभरातून युक्रेनच्या लोकांना मदत केली जात आहे. मग ते हॉलिवूड असोत किंवा भारतीय सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी, सर्वजण पुढे येऊन मदत करत आहेत. त्याचवेळी आता साऊथचा सुपरस्टार राम चरण आणि एसएस राजामौली यांनीही ‘आरआरआर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान महत्त्वाची भूमिका बजावलेल्या युक्रेनियन क्रू मेंबर्सच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

रामचरणने केली आर्थिक मदत

युक्रेन आणि रशिया यांच्यातील चिघळलेल्या युद्धामुळे अनेक युक्रेनियन नागरिकांची घरे उध्वस्त झाली आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, साऊथ अभिनेता रामचरणने (Ram Charan) युक्रेनच्या काही लोकांना आर्थिक मदत केली आहे. जेणेकरून पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळू शकेल. खर तर, रामचरणने ज्या लोकांना मदत केली ते ‘आरआरआर’ चित्रपटात त्याचे बॉडी गार्ड होते. यासोबतच काहीजण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये स्पॉट बॉय म्हणून काम करत होते.

राजामौली यांनीही व्यक्त केली चिंता

एसएस राजामौली यांचा बहुप्रतिक्षित ‘आरआरआर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला खास बनवण्यासाठी राजामौली यांनी जगातील अनेक ठिकाणी शूटिंग केले. त्यापैकी चित्रपटाचा शेवटचा भाग युक्रेनमध्ये शूट करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत स्थानिक क्रू देखील चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सहभागी झाले होते. आता युक्रेन कठीण टप्प्यातून जात असताना, राजामौली यांनी त्यांच्या टीममध्ये काम करणार्‍या युक्रेनियन लोकांबद्दल चिंता व्यक्त केली आणि सांगितले की, ते बर्‍याच लोकांच्या संपर्कात आहेत जे ठीक आहेत. त्याचबरोबर अनेक लोकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. युक्रेन हा अतिशय सुंदर देश आहे, ते परत आल्यावर रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या बातम्या ऐकू येतील, अशी अपेक्षाही त्यांनी केली नव्हती.

चित्रपटाशी संबंधित प्रेक्षकांच्या अपेक्षा

एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांना आशा आहे की, ‘बाहुबली’च्या वेळी दिसलेली जादू पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये पाहायला मिळेल. चित्रपटाची कथा दोन स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित आहे. ‘आरआरआर’ हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्याही भूमिका दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

Latest Post