Wednesday, December 3, 2025
Home बॉलीवूड द काश्मीर फाईल्स सिनेमातील क्रूर आतंकवादी ‘बिट्टा’ची भूमिका ठरली चिन्मय मांडलेकरसाठी टर्निंग पॉइंट

द काश्मीर फाईल्स सिनेमातील क्रूर आतंकवादी ‘बिट्टा’ची भूमिका ठरली चिन्मय मांडलेकरसाठी टर्निंग पॉइंट

सध्या बॉलिवूडमध्ये, मीडियामध्ये किंबहुना सर्वत्र फक्त आणि फक्त एकाच चित्रपटाची चर्चा आहे आणि तो सिनेमा म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून, या चित्रपटातून काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराला दाखवण्यात आले आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडूनही वाहवा मिळत असून, यात काम केलेल्या सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे तुफान कौतुक होत आहे. या चित्रपटाचे कौतुक कलाकरांसोबतच राजकारणी देखील हा चित्रपट बघण्यासाठी सर्वानाच आवाहन करत आहे. या सिनेमात सर्वच कलाकारांचे कौतुक होत असताना या सिनेमात नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकर देखील त्याच्या अभिनयासाठी पात्र ठरताना दिसत आहे.

या सिनेमात ‘बिट्टा’ या अतिशय क्रूर आतंकवाद्याची भूमिका चिन्मयने साकारली आहे. त्याने ही भूमिका इतक्या प्रभावी पद्धतीने पडद्यावर साकारली आहे, की त्याची भूमिका पाहून लोकं आता त्याच्या द्वेष करताना देखील दिसत आहे. त्याच्या या भूमिकेने आणि अभिनयाने या सिनेमाला एक वेगळीच उंची मिळवून दिली आहे. चिन्मयला ‘बिट्टा’च्या भूमिकेत पाहून रसिकांना देखील अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. चिन्मय मांडलेकरने साकारलेल्या या भूमिकेसाठी त्याचे सोशल मीडियावर खूपच कौतुक होत आहे.

चिन्मयने एका मुलाखतीदरम्यान या भूमिकेबद्दल सांगितले की, “जेव्हा विवेक अग्निहोत्री फारुख मल्लिक बिट्टा या भूमिकेसाठी माझा विचार करत असल्याचे मला समजल्यावर मला धक्काच बसला. एकत्र मी मराठी आणि माझ्या स्वभावाच्या अगदी विरुद्ध असलेल्या भूमिकेसाठी माझी निवड झाली होती. या चित्रपटासाठीच्या कास्टिंगचं सर्व श्रेय पल्लवी जोशीला जाते. माझी पहिली ऑडिशन झाली आणि लगेच मी या चित्रपटाचा भाग झालो.”

चिन्मयबद्दल अधिक सांगायचे झाले तर भलेही हिंदीसाठी चिन्मय हे नाव नवीन असले तरी मराठी चित्रपटांमध्ये चिन्मय चांगलाच प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता आहे. चिन्मय हा मूळचा नाशिकचा असून, त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. चिन्मय एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच तो एक उत्तम लेखक आणि दिग्दर्शक देखील आहे. चिन्मयने क्राईम पेट्रोलच्या अनेक भागांमध्ये देखील काम केले आहे. मात्र काश्मीर फाईल्स सिनेमातील त्याच्या ‘बिट्टा’ भूमिकेने त्याला तुफान लोकप्रियता मिळवून दिली आहे.

चिन्मय मांडलेकरने बॉलिवूडमध्ये तेरे बिन लादेन, भावेश जोशी, शंघाई आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. शिवाय तो एमएक्सच्या ‘एक थी बेगम’ सिरीजमध्ये देखील झळकला आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या सिनेमातील प्रत्येक भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने कलाकारांकडून वठवून घेतली आहे. ‘बिट्टा’ ही भूमिका यशस्वी होण्यामागे चिन्मयसोबतच विवेक यांचा देखील मोठा हात आहे. या चित्रपटानंतर चिन्मयला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर नाराजी मिळत आहे.

त्याच्या या भूमिकेबद्दल चिन्मय म्हणाला की, “जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, तेव्हा लोक चित्रपट पाहिल्यानंतर ज्या प्रतिक्रिया देतात, त्याच प्रतिक्रिया मी दिल्या. मला त्याच वेळी माझ्या व्यक्तिरेखेबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला. हे पात्र खूप क्रूर आहे हे मला माहीत होते. चित्रपटातून जो संदेश द्यायचा होता त्यासाठी माझे पात्र क्रूर असायलाच हवं. कथा वस्तुस्थितीवर आधारित आहे. अनेक पात्रं वास्तविक जीवनातील लोकांपासून प्रेरित आहेत.” चिन्मयची ही भूमिका पाहून लोकं सोशल मीडियावर कमेंट्स करत तो राष्ट्रीय पुरस्कारास पात्र असल्याचे सांगत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा