संजय लीला भन्साळीने प्रतीक बब्बरला दिली होती बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची ऑफर, व्यसनामुळे गमावली संधी

फार कमी चित्रपटांमध्ये दिसलेला बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बर याने आता आपल्या करिअरबाबत असा खुलासा केला आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे. प्रतीकने २००७ मध्ये आलेल्या ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटाद्वारे दुसऱ्या मुख्य भूमिकेत पदार्पण केले होते, परंतु त्याने सांगितले की, ज्या चित्रपटातून त्याला पदार्पणाची ऑफर आली होती तो चित्रपट नसून संजय लीला भन्साळी यांनी त्याला मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. तो चित्रपट म्हणजे ‘सावरिया’ चित्रपट. पण त्याला ही संधी गमवावी लागली. त्यावेळी तो अशाप्रकारे व्यसनाच्या गर्तेत बुडाला होता की, या व्यसनातून मुक्त होण्यासाठी त्याला पुनर्वसन केंद्रात दाखल करावे लागले.

आज संजय लीला भन्साळी हे नाव अशा बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे ज्यांच्यासोबत चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार काम करण्याची आकांक्षा बाळगतो, त्यांनी अनेक अभिनेत्यांची कारकीर्द एका उंचीवर नेली आहे, परंतु अभिनेता प्रतीक बब्बर हा अभिनेता आहे ज्याने संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट नाकारला आहे. त्यामुळे काम करण्याची त्याची सुवर्णसंधी हुकली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रतीकने खुलासा केला आहे की, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी त्यांना त्यांच्या ‘सावरिया’ चित्रपटात कास्ट करायचे होते. त्यावेळी तो १८ वर्षांचा होता आणि दुर्दैवाने त्यावेळेस पुनर्वसनात असल्यामुळे या चित्रपटाचा भाग होण्यासाठी तो चुकला. काही वर्षांनंतर आजोबांनी ही गोष्ट सांगितल्याचे त्यांनी सांगितले.

बॉलिवूडचा हँडसम हंक रणबीर कपूरने २००७ मध्ये ‘सावरिया’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. इंडस्ट्रीत प्रवेश करताच रणबीर कपूरने आपल्या लूकने महिला चाहत्यांना वेड लावले. ‘सावरिया’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी, त्यानंतर रणबीर कपूरच्या करिअरने वेग घेतला आणि आज तो बी-टाऊनच्या टॉप हिरोपैकी एक आहे. या चित्रपटाद्वारे अभिनेत्री सोनम कपूरनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट हिट होऊ शकला नाही पण ‘सावरिया’मधली दोघांची धमाकेदार केमिस्ट्री सर्वांनाच भावली. प्रतीकच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचे तर तो लवकरच अक्षय कुमारच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

Latest Post