Friday, February 3, 2023

खेसारी लाल यादवच्या नवीन होळीच्या गाण्याने इंटरनेटवर घातला धुमाकूळ, रोमँटिक अंदाजात दिसला अभिनेता

भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवने आपल्या मेहनत आणि क्षमतेच्या जोरावर यूपी आणि बिहारमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात त्याच्या कामाचा ठसा उमटवला आहे. खेसारीलाल यादव याच्या गाण्यांचे आणि चित्रपटांचे लहान मुलांना वेड लागले आहे. जेव्हा केव्हा खेसारीलाल पडद्यावर दिसतो, तेव्हा तो गोंधळ घालतो. होळीच्या निमित्ताने खेसारीची अनोखी स्टाईल प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. होळीच्या निमित्ताने खेसारीच्या एका गाण्याने इंटरनेटवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्याची अनेक गाणी प्रेक्षकांच्या नेहमीच भेटीला येत असतात.

‘चोरी चोरी चुपके चुपके’ भोजपुरी चित्रपटातील ‘उपसे राही का’ हे हिट गाणे सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जात आहे. खेसारी लाल यादव याच्या गाण्यांचे चाहते भोजपुरी होळी स्पेशल गाणी पुन्हा पुन्हा पाहत आहेत. सहार अफशा भोजपुरी गाण्यात ‘उपसे राही का’मध्ये खेसारी लाल यादवसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. खेसारी आणि भोजपुरी अभिनेत्री सहारची केमिस्ट्री चाहत्यांना वेड लावत आहे.

‘उपसे राही का’ या भोजपुरी गाण्यात खेसारी लाल यादव आणि सहार सुरुवातीला बेडरूममध्ये रोमान्स करताना दिसत आहेत. यानंतर, अभिनेता आणि अभिनेत्री बागेत जोरदार नाचताना दिसत आहेत. ‘चोरी चोरी चुपके चुपके’ चित्रपटातील हे गाणे खेसारी लाल यादव आणि प्रियांका सिंह यांनी गायले आहे. उपसे राही या गाण्याचे बोल आशुतोष तिवारी यांनी लिहिले आहेत. या गाण्याचे दिग्दर्शन रजनीश मिश्रा यांनी केले असून संगीत दिले आहे. खेसारी लाल यादव यांचे हे गाणे खूप जुने आहे, मात्र होळीच्या निमित्ताने भोजपुरी स्टारचे हे गाणे इंटरनेटवर ट्रेंड करू लागले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा :

हे देखील वाचा