सध्या टेलिव्हिजन विश्वात अनेक नवनवीन आणि आश्चर्यकारक गोष्टी घडताना दिसत आहे. अनेक मोठे नावाजलेले कलाकार टीव्हीची लोकप्रियता पाहून या माध्यमाकडे वळताना दिसत आहे. मालिकांची भुरळ अनेक मोठमोठ्या कलाकारांना आपल्याकडे खेचताना दिसत आहे. अशातच रंगभूमी आपल्या अभिनयाने आणि लिखाणाने गाजवणारे दिग्गज अभिनेते संजय मोने लवकरच एका मालिकेमध्ये महत्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. संजय मोने हे नाट्यसृष्टीतील मोठे नाव. नाटकं, चित्रपट आणि मालिकांमधील त्यांच्या त्यांच्या अभिनयाने ते सर्वच प्रेक्षकांना आपलेसे बनवत असतात. आता लवकरच संजय मोने पुन्हा एकदा एका गाजत असणाऱ्या मालिकेमध्ये दिसणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘तुमची मुलगी काय करते’ (Tumchi Mulgi Kay Karte) ही मालिका सध्या एका अतिशय रंजक वळणावर आहे. मालिकेत श्रद्धा आणि अभय मिरजकर यांची मुलगी सावनी गायब झाली असून श्रद्धा तिच्या मुलीला शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे. श्रद्धाच्या या शोध मोहिमेत तिला भेटलेली ‘ताई’ तिच्याच जिवावर उठली आहे. आता प्रश्न आहे की, श्रद्धा तिच्या मुलीला शोधू शकेल का आणि सावनी गुन्हेगार असेल का? आदी अनेक प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या नवीन भागांमधून मिळणार आहेत.
आता यातच ज्येष्ठ अभिनेते संजय मोने (Sanjay Mone) यांनी या मालिकेत एंट्री घेतली आहे. श्रद्धाच्या जीवावर ‘ताई’ उठल्याने तिच्या मदतीला ‘व्यंकट सावंत’ ही व्यक्ती आली आहे. हे पात्र संजय मोने साकारत असून आता या मालिकेत नवीन काय पाहायला मिळते याची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. संजय मोने यांनी याआधी आभाळमाया, अवघाचि संसार, माझिया प्रियाला प्रीत कळेना, आंबट गोड आदी अनेक मालिकांमध्ये काम केले आहेत.
एक उत्तम अभिनेते असण्यासोबतच संजय मोने उत्तम लेखक, दिग्दर्शक आणि संवाद लेखक आहे. त्यांच्या हजरजबाबीपणाचे अनेक किस्से मराठी मनोरंजनविश्वात प्रसिद्ध आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –