बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) नुकत्याच मालदीवमध्ये सुट्या घालवून मुंबईत परतल्या आहेत. सुट्टी साजरी करून परतलेली अभिनेत्री आता तिच्या व्हेकेशनची झलक चाहत्यांसोबत शेअर करत आहे. या मध्ये अभिनेत्री करीना कपूर खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये करीना कपूर तिची मोठी बहीण आणि अभिनेत्री करिश्मा कपूर आणि त्यांची मुले दिसत आहेत.
अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये करीना कपूर, करिश्मा कपूर, समायरा कपूर, कियान, तैमूर आणि जेह कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने “स्प्रिंग ब्रेक २०२२” असे कॅप्शन दिले आहे. तिच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांपासून ते अनेक नामवंत सेलिब्रिटीही आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही तासांपूर्वी शेअर केलेल्या करीनाच्या या पोस्टला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.
करीना कपूरच्या या फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “क्यूट.” तर आणखी एकाने “बेबोचे घरी स्वागत आहे” असे लिहले आहे. काही चाहत्यांनी या फोटोला ‘परफेक्ट फॅमिली’ म्हटले आहे. त्याच वेळी, इतर सोशल मीडिया युजरदेखील इमोजी पोस्ट करताना या फॅमिली फोटोवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत.
यापूर्वी होळीच्या निमित्ताने करीनाने तिचा लहान मुलगा जेहसोबत वाळूत खेळतानाचा एक फोटो शेअर केला होता. करिश्मा आणि करीना सोमवारी (१४ मार्च) आपल्या मुलांसह एका खासगी जेटने मालदीवला रवाना झाल्या होत्या. मात्र, यादरम्यान करिनाचा पती सैफ अली खान तिच्यासोबत सुट्टी घालवण्यासाठी गेला नाही. गेल्या वर्षी सैफ आणि करीना आपल्या मुलांसोबत सैफचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मालदीवला गेले होते.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर करीना कपूर खान लवकरच बॉलिवूड अभिनेता आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ११ ऑगस्ट रोजी देशभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे, ज्यामध्ये टॉम हँक्स मुख्य भूमिकेत होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –