Thursday, March 28, 2024

गायिका जुईली जोगळेकरच्या घराची झालीय ‘अशी’ अवस्था; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘हे काय झालं?’

मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते आणि अभिनेत्रींचे श्वान प्रेम नेहमीच चर्चेचा मुद्दा असतो. हे कलाकार आपल्या पाळीव प्राण्यांवर प्रचंड जीव लावत असतात. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या श्वानांसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. सध्या  प्रसिद्ध गायिका जुईली जोगळेकरच्या (Juilee Joglekar) घरातील एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिच्या श्वानाने घराची भयानक अवस्था पासून सगळेच थक्क झाले आहेत. काय आहे हे सगळे प्रकरण चला जाणून घेऊ.

जुईली जोगळेकर ही मराठी संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. गाण्यांइतकीच जुईलीच्या सोशल मीडिया पोस्टचीही नेहमीच चर्चा होत असते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमीच अनेक हटके फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या जुईलीने तिच्या घराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिच्या श्वानाने घरातील गादी आणि उश्या फाडून त्यामधला सगळा कापूस अस्ताव्यस्त पसरलेला दिसत आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

जुईलीने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत त्याला,  “माझं शहाण बाळ” असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. या व्हायरल व्हिडिओवर फक्त चाहतेच नव्हे, तर अनेक कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये अंशुमन आपटेने “वा क्या बात है” म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. तर “अनेकांनी कोणाचे बाळ आहे हे?” असा भन्नाट प्रश्न जुईलीला विचारला आहे. सध्या या व्हिडिओची सगळीकडे चर्चा होत आहे.

दरम्यान जुईली जोगळेकर आणि रोहित राऊत हे मराठी चित्रपट क्षेत्रातील क्यूट कपल म्हणून ओळखले जाते. दोघेही अनेकदा आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा