Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड शाहरुख अन् सलमानमध्ये पुन्हा पेटलाय वाद? समोर आलेला व्हिडिओ पाहून चाहते पडले चिंतेत

शाहरुख अन् सलमानमध्ये पुन्हा पेटलाय वाद? समोर आलेला व्हिडिओ पाहून चाहते पडले चिंतेत

आज शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि सलमान खान (Salman Khan) यांच्यात चांगली मैत्री आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा दोघांमध्ये कट्टर वैर होते. त्याच वेळी, आर्यन खान (Aryan Khan) तुरुंगात गेल्यानंतर सलमानने शाहरुखला सर्वाधिक मदत केली. परंतु काही वर्षांपूर्वी पार्टी किंवा अवॉर्ड फंक्शनमध्ये दोघेही एकमेकांकडे साफ दुर्लक्ष करायचे. नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन सुपरस्टार्समध्ये भांडण पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘हम तुम्हारे हैं सनम’ चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग बोलला जात आहे. चित्रपटाच्या या सीनमध्ये सलमान आणि शाहरुखची भांडणे होत असतात. व्हिडीओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले की, असे काय झाले. जवळचे मित्रच पुन्हा शत्रू कसे काय झाले. नेटकऱ्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. पण नीट पाहिल्यास लक्षात येईल की, हे खरे शाहरुख-सलमान नसून त्यांचे डुप्लिकेट आहेत. (shahrukh khan and salman khan lookalike duplicates fight video goes viral on social media)

व्हिडिओमध्ये शाहरुखची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव इब्राहिम कादरी आहे, तर सलमान खानची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे नाव परवेझ काझी आहे. इब्राहिम कादरी शाहरुखच्या भूमिकेत इतका परफेक्ट दिसतो की त्याच्या सोशल मीडियावर त्याची फॅन फॉलोविंग वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, त्याने फक्त शाहरुख खानला त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून फॉलो केले आहे. त्याचवेळी परवेझचे चाहतेही कमी नाहीयेत.

शाहरुख खानच्या आगामी ‘पठान’ चित्रपटात सलमान खान एक छोटी भूमिका साकारत आहे. अलीकडेच, सलमान खानबद्दल अशी बातमी आली होती की, जेव्हा त्याने शाहरुख खानच्या आगामी ‘पठाण’ चित्रपटातील काही सीन पाहिले, तर भाईजानने त्याचे जोरदार कौतुक केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा