शाहरुख खानने होळीच्या मुहूर्तावरच केले होते दिव्या भारतीला प्रपोज, वाचा पूर्ण किस्सा

शाहरुख खानला (Shah Rukh Khan) बॉलिवूडचा सर्वात रोमँटिक हिरो म्हटले जाते. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘जब तक है जान’ यांसारख्या चित्रपटांमधून त्याने चाहत्यांना प्रेम व्यक्त करण्याचे नवीन मार्ग शिकवले. पण त्याच्याकडे असाच एक चित्रपट आहे, ज्यामध्ये त्याने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी होळीचा दिवस निवडला होता. या चित्रपटातही त्याने आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने केले आहे. तो चित्रपट म्हणजे ‘दीवाना’ होय. यात तो एका विधवा महिलेची भूमिका करणाऱ्या दिव्या भारतीला (Divya Bharti) प्रपोज करताना दिसत आहे.

शाहरुख खानने ‘दीवाना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ऋषी कपूर (Rishi kapoor) आणि दिव्या भारती यांच्याही मुख्य भूमिका होत्या. त्यावेळी या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात शाहरुखने राजा सहाय नावाच्या तरुण मुलाची भूमिका साकारली होती. जो एका विधवा मुलीच्या प्रेमात पडतो. खूप धाडस करून राजा होळीचा दिवस निवडतो. होळीच्या निमित्ताने या सीनशी संबंधित एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

शाहरुख खानने वेगळ्याच अंदाजात केले प्रपोज
शाहरुख खान हळूहळू दिव्या भारतीकडे सरकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि तिच्याकडे रागाने पाहतो. मग त्याच्या प्रेमाची कबुली पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतो. तो म्हणतो की, “मी अस्वस्थ झालो आहे, मी तुझ्या प्रेमात पडलो आहे.” यावर दिव्या म्हणाली की, “पण मी तुझ्यावर प्रेम नाही करत.” तेव्हा शाहरुख म्हणतो की, “पण तू कोणालातरी तुझ्यावर प्रेम करण्यापासून रोखू शकत नाही.”

शाहरुख खानचा प्रस्ताव स्वीकारला
शाहरुख खान पुढे म्हणतो की, “मी काय करू? मला सांग की काय करावे जेणेकरून तुला खात्री होईल. मी माझा जीव द्यावा का? मी मरू का?” यानंतर दिव्या म्हणते की, “मी असं म्हटलं नाही.” यानंतर दोघांच्या नजरेत चर्चा रंगली आहे. शाहरुख हसायला लागतो आणि तिच्यावर गुलाल उधळतो आणि म्हणतो, “जान बक्शने के लिए शुक्रिया.”

इथे क्लिक करून पाहा व्हिडिओ

शाहरुख खान २०१८ साली ‘जीरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्माही दिसल्या होत्या. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर शाहरुख खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आणि आता तो थेट ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान साऊथ डायरेक्टर एटली आणि राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटातही दिसणार आहे. मात्र, या चित्रपटांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post