Friday, April 19, 2024

भारीच ना! ‘या’ चित्रपटात सुपरस्टार चिरंजीवीसोबत दिसणार सलमान खान; अभिनेत्याने केली घोषणा

आज प्रत्येकजण साऊथच्या चित्रपटांकडे धावताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये क्वचितच असा कोणी असेल जो साऊथ चित्रपटांचे रिमेक करत नसेल. या अभिनेत्याने या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक साईन केला आहे किंवा या चित्रपटाचे कॉपीराइट विकत घेतल्याची बातमी सतत समोर येत असते. आजकाल बॉलिवूडवर साऊथचा पूर्ण दबदबा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम आता अभिनेता सलमान खानवरही (Salman Khan) दिसून येत आहे. अलीकडेच त्याने ‘गॉडफादर’ चित्रपटासाठी साऊथचे सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांच्यासोबत हातमिळवणी केली आहे.

खुद्द चिरंजीवी यांनी ही माहिती ट्विटरवर शेअर केली आहे. तसेच सलमान खानसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये चिरंजीवी सलमानला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देताना दिसत आहेत. या फोटोत दोघेही चित्रपटाच्या सेटवर उभे आहेत आणि हसत आहेत. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने त्याच्या आगामी तेलुगू ऍक्शन चित्रपट ‘गॉडफादर’चे (Godfather) शूटिंग सुरू केले आहे. ज्याचे दिग्दर्शन साऊथ सुपरस्टार चिरंजीवी करत आहेत. हा चित्रपट अभिनेता पृथ्वीराज सुकुमारनच्या मल्याळम-दिग्दर्शित ‘लुसिफर’ चा रिमेक आहे. ज्यामध्ये मोहनलाल मुख्य भूमिकेत होते. ‘गॉडफादर’मध्ये सलमान खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट त्याचा तेलुगु चित्रपटसृष्टीतील पदार्पण आहे. चिरंजीवी यांनी ट्विटरवर सेटवरील सलमान खानसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

सलमान खान दिसणार तेलगू चित्रपटात
अभिनेते चिरंजीवी म्हणाले की, “गॉडफादर, भाऊ @BeingSalmanKhan मध्ये आपले स्वागत आहे! तुमच्या एंट्रीने सगळ्यांना उत्तेजित केले आहे आणि उत्साह पुढच्या पातळीवर पोहोचला आहे. तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करणे हा खूप आनंददायी आहे. तुमची उपस्थिती निःसंशयपणे प्रेक्षकांना ती जादुई #किक देईल.”

‘गॉडफादर’मध्ये साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आणि सत्यदेव कंचरण यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा यांनी केले असून, कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी आणि सुपर गुड फिल्म्स यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटाच्या सेटच्या काही दिवस आधी या चित्रपटाच्या मुहूर्ताच्या दिवशी चिरंजीवी सेटवरची तयारी पाहत असतानाचे फोटो समोर आले होते.

 ‘अंतीम: द फायनल ट्रुथ’ मध्ये दिसला शेवटचा
सलमान खान सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असला तरी तो शेवटचा ‘अंतीम: द फायनल ट्रुथ’मध्ये मोठ्या पडद्यावर दिसला होता. या चित्रपटात त्याचा मेहुणा आयुष शर्माही त्याच्यासोबत दमदार अवतारात दिसला होता.

हे देखील वाचा