अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने बॉलिवूडची क्वीन चर्चेत असते. देशातील प्रत्येक ज्वलंत मुद्द्यावर कंगनाचे मत हे ठरलेले असते. यामुळे बऱ्याचदा वादही निर्माण होतो. मात्र गप्प बसेल ती कंगना कसली. आपल्या बोलण्याने कोणाला काही फरक पडेल, वाद निर्माण होइल याचा ती कधीही विचार करत नाही. आज (२३ मार्च) अभिनेत्री कंगना रणौतचा वाढदिवस, जाणून घेऊ या कंगनाच्या असाच काही वादाबद्दल.
कंगना रणौत ही हिंदी चित्रपट जगतातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने तिने चित्रपट जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या चित्रपटांइतकीच ती तिच्या विवादित बोलण्यानेही नेहमीच चर्चेत असते. यापैकी कंगना रणौत आणि शिवसेना हा वाद देशभर चांगलाच गाजला होता. या संपुर्ण वादाची सुरूवात कंगनाच्या एका वादग्रस्त ट्वीटमुळे झाली होती. ज्यामध्ये कंगनाने मुंबइची तुलना पाकव्याप्त काश्मिरसोबत केली होती.
या तिच्या वक्तव्याचा समाचार घेताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाने मुंबईमध्ये पाउल ठेवू नये अशी धमकी दिली होती यावर कंगनाने ही मुंबई कोणाच्या बापाची नाही, मला कोणी आडवू शकत नाही. असे म्हणत शिवसेना पक्षाला जाहीर आव्हान दिले होते. तिच्या या वक्तव्याने राज्यभरातील अनेक नेत्यांनी कंगनावर जोरदार टीका केली होती. कंगनाच्या या बोलण्यावर जोरदार टीका करताना ‘आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील’ असा इशाराच संजय राऊत यांनी दिला होता. मात्र कंगनाने काही तिचा आक्रमक पवित्रा सोडला नाही. यावेळी तिच्या मुंबईमधील कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने कारवाई करत तिचे ऑफिस पाडले होते, यावरुनही कंगणाने शिवसेनेवर निशाणा साधला होता.
दरम्यान वाद आणि कंगणा हे प्रकरण काही देशाला नवीन नाही. याआधीही कंगनाने अनेक वादात उडी घेतली आहे. ती नेहमीच मोदींचे समर्थन करताना इतर पक्षावंर टीका करताना दिसत असते. काही महिन्यांपूर्वी तिने भारत देश २०१४ नंतरच स्वातंत्र झाला आहे. अशी मुक्ताफळे उधळली होती. यामुळेही मोठा वाद निर्माण झाला होता. तिच्या या वक्तव्यावर अनेकांनी जोरदार टीका केली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –