सोनू निगम(Sonu Nigam) हा भारतीय संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो. आपल्या जादूई आवाजाने त्याने संगीत क्षेत्रात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. सोनूच्या आवाजाचे असंख्य चाहते देशभर पाहायला मिळतात. त्याचे नव्याने आलेले प्रत्येक गाणे तरुणाईला वेड लावत असते. मात्र सध्या सोनु निगमबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.ती म्हणजे मुंबई महापालिका आयुक्तांच्या नातेवाईकांनी धमकी दिल्याच्या वृत्ताने सगळीकडे खळबळ माजली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, प्रसिद्ध गायक सोनू निगमला मोफत कार्यक्रम करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच असे न केल्यास त्याला नोटीस पाठवून तोडफोड केली जाईल अशी धमकीही देण्यात आली आहे. ही धमकी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्या चुलत भावाने केल्याचीही माहिती उघड झाली आहे. या सगळ्या प्रकरणाचा उलघडा आमदार अमित साटम यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन राज्य सरकारने कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. याबद्दल बोलताना अमित साटम म्हणाले की, “सोनू निगमने तक्रार दाखल केली आहे की, आयुक्त इकबाल सिंग चहल यांचा भाऊ राजेंद्रने मोफत कार्यक्रम आयोजित करण्याची मागणी केली आहे. तसेच असे न केल्यास त्याच्या घरी नोटीस पाठवून तोडफोड केली जाईल अशी थेट धमकीही दिली आहे. त्यामुळे चहल यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी.” आमदार अमित साटम यांनी विधानसभेत ही माहिती दिली आहे. तसेच या सगळ्या संवादाची संभाषण क्लिप सोनू निगमकडे असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान या सगळ्या आरोपांचे खंडण करताना इकबाल सिंग यांनी राजेंद्र नावाचा माझा कोणताच नातेवाईक किंवा भाऊ नाही, मी अत्यंत जबाबदारीने हे बोलत आहे. मी राज्यस्थानमध्ये ज्या जिल्ह्यात जन्मलो त्याच जिल्ह्यातले हे आहेत त्यामुळे माझ्या बदनामीसाठी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा शब्दात हे सगळे आरोप फेटाळले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा –
- HAPPY BIRTHDAY : ‘हे’ आहेत प्रकाश राज यांचे गाजलेले सर्वोत्कृष्ट चित्रपट
- वाढदिवस विशेष : मालिकांमधून पोहचली घराघरात, ‘या’ कारणामुळे अनेरी वजानीने सोडली ‘अनुपमा’ मालिका
- आपल्यापेक्षा १२ वर्षे लहान मुलीसोबत लग्न, ६ वर्षे इंडस्ट्रीतून बॅन; तरीही प्रकाश राज वाजवतायत अभिनयाचा डंका