Saturday, July 27, 2024

आपल्यापेक्षा 12 वर्षे लहान मुलीसोबत लग्न, 6 वर्षे इंडस्ट्रीतून बॅन; तरीही प्रकाश राज वाजवतायत अभिनयाचा डंका

‘आली रे आली आता तुझी बारी आली’ हा संवाद ऐकला की, डोळ्यासमोर उभा राहतो धिप्पाड देहबोली असणारा प्रतिभावंत अभिनेता प्रकाश राज. ‘वॉन्टेड’ मधला गनी भाई असो नाहीतर ‘सिंघम’ मधला जयकांत शिक्रे प्रकाश यांनी त्यांच्या सर्व भूमिका अतिशय प्रभावशाली पडद्यावर साकारल्या. प्रकाश यांनी त्यांच्या जिवंत अभिनयाने बॉलिवूड आणि टॉलिवूड या दोन्ही इंडस्ट्री जोरदार गाजवल्या. दोन्ही इंडस्ट्रीमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप पाडली. आज प्रकाश त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 26 मार्च 1965 रोजी बंगळुरूमध्ये झाला. त्यांचे वडील तुलु तर आई कन्नड होती.

प्रकाश यांचे भाऊ प्रसाद राज देखील अभिनेते होते. त्यामुळे ते देखील अभिनयात गेले. सुरुवातीच्या काळात प्रकाश यांनी अनेक स्टेज शो केले. त्यांनी सुमारे 2000 नाटकांमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी बंगळुरूमध्ये कलाक्षेत्र नावाच्या संस्थेत प्रवेश घेतला. इथूनच त्यांच्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. बराच काळ त्यांनी कन्नड टेलिव्हिजन क्षेत्रात काम केले. त्यानंतर 1994 मध्ये ‘डुएट’ या सिनेमातून त्यांनी तमिळ सिनेसृष्टींमध्ये पदार्पण केले. प्रकाश यांनी तामिलसोबतच तेलुगु, कन्नड, मल्याळम, हिंदी आदी अनेक भाषांमध्ये काम केले. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या प्रकाश यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांच्या अभिनयाचा डंका वाजवला. प्रकाश राज यांचे खरे नाव प्रकाश राय असे होते. मात्र, त्यांचे तामिळ दिग्दर्शक के. बालाचंदर यांच्या सांगण्यावरून प्रकाश यांनी त्यांचे नाव बदलले आणि ते प्रकाश राय ऐवजी प्रकाश राज म्हणून काम करू लागले.

बॉलिवूडमध्ये प्रकाश यांनी सुरुवातीच्या काळात अनेक लहान- मोठ्या भूमिका साकारल्या. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती वाँटेड सिनेमातील गनी भाई या भूमिकेमुळे. त्यानंतर आलेल्या सिंघम सिनेमातील जयकांत शिक्रे तर प्रचंड भाव खाऊन गेला. सिंघम चित्रपटातील त्यांची भूमिका, अभिनय, त्याचे संवाद आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत. हा सिनेमा आणि त्यांची भूमिका खूपच प्रसिद्ध झाली. हा सिनेमा त्यांच्या करियरमधला टर्निग पॉईंट ठरला. यानंतर प्रकाश यांनी बॉलिवूडमध्ये ‘एक से बढकर एक’ भूमिका केल्या. हिंदी सिनेमांमध्ये त्यांना नकारत्मक भूमिकांनी खूप प्रेम मिळवून दिले.

प्रकाश राज यांचे व्यावसायिक जीवन तर सर्वांनाच माहित आहे. मात्र, त्यांचे वैयक्तिक जीवन खूप संघर्षमय होते. प्रकाश राज यांनी 1994 साली तमिळ अभिनेत्री ललिता कुमारी यांच्यासोबत लग्न केले. त्यांना 2 मुली आणि 1 मुलगा असे तीन अपत्य होते. मात्र, त्यांच्या मुलाचे पाच वर्षाचा असताना निधन झाले. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. पण काही कारणांनी 2009मध्ये ललिता आणि प्रकाश यांनी घटस्फोट घेतला. माध्यमांतील वृत्तानुसार, हा घटस्फोट घेताना प्रकाश यांनी त्यांच्या दोन्ही मुली मेघना आणि पूजा यांना सर्व सांगितले होते. त्यानंतर ते दोघे वेगळे झाले. मात्र, आजही त्यांची पहिली पत्नी आणि प्रकाश यांच्या आईचे नाते अतिशय चांगले आहे.

पुढे 2010 साली त्यांनी पोनी वर्मा या कोरिओग्राफरसोबत दुसरे लग्न केले. पोनी आणि त्यांची भेट एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. पोनीला पाहताचक्षणी प्रकाश तिच्या प्रेमात पडले. पुढे या दोघांनी जेव्हा लग्न करायचे ठरवले, तेव्हा प्रकाश यांच्या समोर त्यांच्या मुलींना हे पटेल का आणि आवडेल का हा मोठा प्रश्न होता. त्यांनी हे लग्न करताना प्रकाश यांनी त्यांच्या मुलींची परवानगी घेतल्याचे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते. पोनी यांच्याशी लग्न केल्यानंतर 2015 साली त्यांना एक मुलगा झाला. पोनी ही दाक्षिणात्यसोबत हिंदी चित्रपटांमध्ये प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. प्रकाश आणि पोनी यांच्यामध्ये 12 वर्षाचे अंतर आहे.

प्रकाश यांच्या मुलाचे निधन अतिशय छोट्या कारणामुळे आणि अचानक झाले होते. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांचा मुलगा पतंग उडवत होता आणि उडवता उडवता केवळ एक फुटाच्या अंतरावरून तो खाली डोक्यावर पडला आणि काही महिन्यांनी त्याला झटके येऊ लागले. डोक्याला जोरात मार लागल्यामुळे त्याला हा त्रास सुरू झाला होता. यातच त्यांच्या मुलाचे निधन झाले. प्रकाश यांनी त्यांच्या शेतातच त्यांच्या मुलाचा अंतिम विधी केला होता. त्यांनी पुढे सांगितले की, ते अजूनही त्यांच्या मुलाला विसरू शकले नाहीयेत.

प्रकाश राज हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे आणि त्यांच्या वागण्यावरून चर्चेचा विषय ठरत असतात. त्यामुळेच त्यांना 6 वर्षांसाठी तमिळ इंडस्ट्रीने बॅन केले होते. असे पहिल्यांदा झाले की एखाद्या कलाकाराला बॅन केले गेले. प्रकाश हे त्यांच्या सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. नेहमी ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चालू घडामोडींवर त्यांचे स्पष्ट आणि परखड मतं मांडताना दिसतात.

प्रकाश राज केवळ अभिनेते नाहीतर ते चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते देखील आहे. त्यांनी त्यांच्या करियरमध्ये 5 राष्ट्रीय पुरस्कार, 6 नंदी पुरस्कार, 8 तमिळनाडू स्टेट फिल्म पुरस्कार, 5 दाक्षिणात्य फिल्मफेयर पुरस्कारांसोबतच अनेक पुरस्कार मिळवले आहेत. (prakash raj celebrate his birthday lets know about his life)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तू चाल पुढं’ या मालिकेच्या माध्यमातून ‘ही’ बॉलिवूड दिवा करणारा मराठी मालिकेत पदार्पण

दुःखद! ‘या’ टेलिव्हिजन, चित्रपट अभिनेत्रीच्या पतीचे निधन, बाथरूममध्ये आढळले मृत अवस्थेत

हे देखील वाचा