×

सोनू निगमने पद्मश्री पुरस्कार सन्मानित केला ‘या’ खास व्यक्तीला, म्हणाला ‘या’ व्यक्तीमुळेच मी आज आहे

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच पद्म पुरस्कार २०२२ (Padma Awards 2022) यांची घोषणा करण्यात आली. विविध क्षेत्रातील दिग्गजांना या सर्वोच्च मानाच्या पुरस्कराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी देखील अनेक मोठ्या लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील १२८ लोकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यात बॉलिवूडमधील मोठा गायक असणाऱ्या सोनू निगमचा (Sonu Nigam) देखील समावेश आहे. सोनू निगमला पदमश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सोनू निगमला पदमश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्याने सांगितले की, “२५ जानेवारी माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खूपच खास दिवस आहे. मी भारत सरकारला धन्यवाद म्हणू इच्छितो, ज्यांनी मला पद्मश्री पुरस्कारासाठी निवडले. त्या सर्व लोकांना माझा खूप मोठा धन्यवाद, ज्यांनी मला पुरस्कारासाठी योग्य समजले आणि मला यासाठी निवडले. मी माझ्या आईचे शोभा निगम आणि वडील अगम निगम यांचे आभार मानतो. मी हा सन्मान माझ्या आईला समर्पित करतो. आज ती असती तर तिच्या डोळ्यात नक्कीच आनंद अश्रू आले असते. आज मी जे काही आहे, ते फक्त माझ्या आईमुळे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात जे लोकं माझ्यासोबत जोडले गेले त्यांचे देखील खूप आभार.”

View this post on Instagram

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

सोनू निगमला आतापर्यंत अनेक मोठमोठ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००३ साली त्याला ‘कल हो ना हो’ गाण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आला होता. सोनू निगमने आतापर्यंत हिंदीसोबतच कन्नड़, उड़िया, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगु, मलयालम, मराठी, नेपाली, भोजुपरी भाषांमध्ये देखील गाणी गायली आहेत. ‘संदेसे आते हैं’, ‘भगवान है कहां रे तू’, ‘अभी मुझ में कहीं’, ‘मैं अगर कहूं’, ‘हंस मत पगली’, ‘सूरज हुआ मद्धम’ आदी अनेक हिट गाणी त्याने गायली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial)

हरियाणातील फरिदाबामध्ये जन्मलेल्या १८ वर्षीय सोनुने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच गाणे गायला सुरुवात केली होती. तर १९९० साली सोनूला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला होता. सोनू गाण्यासोबतच अनेक सिंगिंग शोचे परीक्षण करताना देखील दिसतो.

हेही वाचा :

सौंदर्याची खाण असलेल्या सोनाली कुलकर्णीचे बोल्ड फोटो समोर, चाहते म्हणतायेत, ‘इथे आग लागली ना राव’

मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेल्या अनुष्का शर्माचे चमकले नशीब, ‘अशी’ मिळाली किंग खानसोबत काम करण्याची संधी

‘आमच्या पवानगीशिवाय…’ सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्याचा चाहत्याने दिले ‘हे’ अनोखे आवाहन

Latest Post