‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटतील २८ सेकंदच्या भोवई आणि डोळ्यांच्या खानाखुणांनी इशारे करणारी प्रिया प्रकाश वारीयर २०१८मध्ये एका व्हिडिओ क्लिपद्वारे करोडो भारतीयांच्या हृदयात घर करुन गेली. तेव्हा जवळपास एक महिना देशांत केवळ प्रियाच्या नावाचीच चर्चा होती.
राजकारणापासून ते बॉलीवूडपर्यंत सगळीकडे तिच्याच मिम्सचा पाऊस पडत होता. हीच प्रिया प्रकाश वारीयर पुढे मल्याळम चित्रपटातील एक मॉडेल आणि उत्तम अभिनेत्री बनलीच परंतू अनेकांचा सोशल मीडिया क्रशही झाली.
सोशल मीडियावर अनेक फॅन्स असलेली प्रिया आपल्या अनेक फोटो आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच एक नवीन व्हिडीओ ती चाहत्यांच्या भेटीला घेऊन आली आहे, जो मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर वायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती अरजित सिंग आणि श्रेया घोषाल यांचे प्रसिद्ध गाणे ‘मनवा लागे रे’वर चेहऱ्यावर अनेक हावभाव दाखवत आहे.
या व्हिडिओमध्ये तीने करड्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, ज्यात ती कमालीची सुंदर दिसत आहे. सोबतच तिच्या कपाळावरच्या टिकलीने तिच्या सौंदर्यात अधिकच भर घातली आहे. तिचा हा पारंपरिक लूक खूपच उठून दिसतोय, ज्यामुळे ती अधिकच गोड दिसत आहे. या गोड लूकसोबत तिच्या हावभावांनी तिचे चाहते खूपच प्रभावित झाले असून या पोस्टवर तिला खूपच प्रतिक्रिया येत आहेत.
आपल्या नवनवीन पोस्टमुळे प्रकाशझोतात येण्याची तिची ही काही पहिलीच वेळ नाही. या अगोदर सुद्धा आपल्या वेगवेगळ्या हॉट आणि गोड लूकमूळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. तिला इन्स्टाग्रामवर सत्तर लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
तिचा एक युट्युब चॅनेल देखील आहे, ज्यात ती तिच्या गायनाचे कौशल्य दाखवत असते. आपल्या ‘विंक आणि फायर गन’ च्या हावभावाने ती एका रात्रीत प्रचंड लोकप्रिय झाली होती. लवकरच ती ‘श्रीदेवी बंगला’ आणि ‘ लव्ह हॅकर्स’ या चित्रपटांमार्फत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हेही वाचा-
–गुलाबी रंगात अप्सरेचं सौंदर्य आणखीनच खुललं, सोनालीच्या अदा अन् सौंदर्य पाहून चाहते घायाळ; पाहा फोटो
–सपना चौधरीच्या अदाकारी घालतायत धुमाकूळ! व्हायरल व्हिडिओचा सिलसिला कायम
–कृष्णा अभिषेकच्या पत्नीने शेअर केला हॉट आणि बोल्ड व्हिडिओ; चाहतेही झाले क्लीन बोल्ड