Thursday, November 14, 2024
Home मराठी सपना चौधरीच्या अदाकारी घालतायत धुमाकूळ! व्हायरल व्हिडिओचा सिलसिला कायम

सपना चौधरीच्या अदाकारी घालतायत धुमाकूळ! व्हायरल व्हिडिओचा सिलसिला कायम

आपल्याला सुप्रसिद्ध डांसर सपना चौधरी तर ठाऊक असेलच. या वर्षी करोना काळ असल्यामुळे सपनाचे डांस शोज झालेच नाहीत. यानंतर जेव्हा अनलॉक व्हायला सुरुवात झाली तोपर्यंत सपना गर्भवती झाली होती. तसही अनलॉक सुरू झालं परंतु सार्वजनिक कार्यक्रमांना अजूनही बंदीच होती. पण याचा कसलाही अडसर सपनाच्या चाहत्यांच्या मनोरंजनामध्ये आला नाही. कारण सपनाच्या मागील काही वर्षांमधील शोजच्या व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इतके की तिच्या प्रत्येक व्हिडिओला कोटींमध्ये व्ह्यूज येत आहेत. आता कोणता नवा व्हिडीओ सपनाचा व्हायरल झाला आहे चला पाहुयात!

भोजपुरी, पंजाबी आणि हरियाणवी गाण्यांवर डांस करणाऱ्या सपना चौधरीच्या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सपनाचा हा जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो फार जुना आहे. परंतु तो आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या व्हिडिओमध्ये सपना बलम मन ले जा रे या गाण्यावर डांस करताना दिसत आहे. तिच्या सोबत आणखीन एक लहान मुलगी सुद्धा आपल्याला डांस करताना दिसतेय. यावरूनच आपण सपनाच्या लोकप्रियतेचा अंदाज लावू शकता. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की सपना एक वेगळ्याच जोशात डांस करतेय. तिच्या या डांस स्टेप्सवर तिला पाहायला आलेली गर्दी सुद्धा आपल्याला थिरकताना दिसत आहे. सपनाचा हा व्हिडिओ आतापर्यंत एक कोटींहूनही अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हरियाणवी सिनेमांमध्ये प्रसिद्धी मिळाल्यानंतर सपना बिग बॉस मध्ये स्पर्धक म्हणून आली होती. तिने बिग बॉस मध्ये देखील तिच्या स्टाईलमध्ये धमाल केली होती. बिग बॉस मधून बाहेर पडल्यावर तिला भोजपुरी आणि पंजाबी सिनेमांमध्ये झळकण्याची संधी मिळाली. यानंतर तिने बोलीवूडमध्येही पदार्पण केलं. आजच्या घडीला सपनाला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीये. काही दिवसांपूर्वी सपना आई झाली असून तिने एक गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा