कृष्णा अभिषेकच्या पत्नीने शेअर केला हॉट आणि बोल्ड व्हिडिओ; चाहतेही झाले ‘क्लीन बोल्ड’

Comedian krushna Abhishek Wife Kashmera Shah Posted Hot Video On Instagram Going Viral On Internet


सध्या सामान्य व्यक्तीपासून ते कलाकारांपर्यंत अनेकजण आपल्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. रोजच्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या- वाईट गोष्टी ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. यामध्ये चाहत्यांना आपल्या अभिनयाने खदखदून हसवणारा अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी आणि अभिनेत्री कश्मिरा शाह हिचा समावेश आहे. तिने नुकताच आपला हॉट आणि बोल्ड व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे.

आपल्या या लूकमधील एक व्हिडिओला कॅप्शन देत तिने सांगितले आहे की, कशाप्रकारे ती आपला पती कृष्णा अभिषेकच्या परवानगीने प्रत्येक काम करते, मग ते व्हिडिओ पोस्ट करणे का असेना.

कश्मिराने स्विमिंग पूलवरील हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती आपल्या जबरदस्त फिगरमध्ये दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या मोनोकिनीमध्ये कश्मिरा सुपर सेक्सी दिसत आहे. तिची हॉटनेस पाहून चाहतेही ‘क्लीन बोल्ड’ झाले आहेत.

या व्हिडिओला कॅप्शन देत तिने लिहिले की, “स्वत:वर विश्वास ठेवण्यास कधीही उशीर होत नाही.” यादरम्यान तिने इतरांनाही स्वत:वर विश्वास ठेवायला आणि पुढे जाण्याचा सल्ला दिला आहे. परंतु यादरम्यान सर्वात मजेशीर गोष्ट अशी की, तिने शेअर केलेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये क्रेडिट दिले आहेत.

खरं तर कश्मिराने व्हिडिओला क्रेडिट देताना आपला पती कृष्णा अभिषेकचाही उल्लेख केला आहे. तिने लिहिले आहे की, “पतीची परवानगी घेऊन.” यामध्ये तिने हार्ट इमोजीचाही समावेश केला आहे.

खरंतर यापूर्वी ‘व्हॅलेंटाईन डे’लाही कश्मिराने आपल्या पतीसोबतचे काही सुंदर फोटो आपल्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले होते. यामध्ये तिने लिहिले होते की, ‘मला हे सांगण्याची आवश्यकता नाही की, तू माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहेस. तुझं माझ्यासोबत प्रत्येक वेळी असणंच माझ्यासाठी व्हॅलेंटाईन डेप्रमाणे आहे. माझा सर्वात चांगला मित्र आणि माझा पती.’

कश्मिरा नुकतीच ‘बिग बॉस १४’मध्ये दिसली होती. यामध्ये तिने चॅलेंजर म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली होती. यादरम्यान तिच्यासोबत विकास गुप्ता, राखी सावंत, अर्शी खान, राहुल महाजन आणि मनू पंजाबी यांनीही चॅलेंजर म्हणून घरात एंट्री घेतली होती. तरीही, कश्मिराला जास्त दिवस चाहत्यांचे मनोरंजन करता आले नाही, त्यामुळे ती २ आठवड्यातच बाहेर पडली होती.

कश्मिराने मराठी आणि हिंदी अशा दोन्हीही चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘शिकारी’, ‘और पप्पू पास हो गया’, ‘मारने भी दो यारो’ या चित्रपटांचा समावेश आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.