संदीप नाहर आत्महत्या केसमध्ये संदीपची बायको आणि सासू जाणार तुरुंगात? आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली त्यांच्याविरोधात केस दाखल
धोनी सिनेमात एमएस धोनीच्या मित्राची भूमिका साकारलेला अभिनेता संदीप नाहरने नुकतीच त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. संदीपने धोनी चित्रपटासोबतच अल्ट बालाजीच्या कहने को हमसफर हैं, अक्षय कुमारच्या केसरी आणि काही मालिका, वेबसिरीजमध्ये काम केले होते.
संदीपने फेसबुकवर एक व्हिडिओच्या माध्यमातून त्याची सुसाईड नोट पोस्ट केली होती. या व्हिडिओमध्ये त्याने त्याच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांमुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. यात त्याने त्याच्या बायकोचे आणि बायकोच्या आईचे नाव घेतले. त्यामुळे यात या दोघीं विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी संदीपने पोस्ट केलेल्या व्हिडिओनंतर त्याची पत्नी कांचन शर्मा आणि सासूच्या विरोधात संदिपला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली केस दाखल केली आहे.
संदीपने जेव्हा त्याचा हा व्हिडिओ जेव्हा फेसबुकवर पोस्ट केला त्यानंतर लगेचच सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत संदीपने आत्महत्या केली होती.
संदीपने त्याच्या सुसाइड नोटमध्ये सांगितले आहे की, “आता जगण्याचीच इच्छा होत नाहीये. आयुष्यात अनेक सुख दु:ख पाहिली, पण सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ती सहनशीलतेपलीकडची आहे. आत्महत्या करणे भ्याडपणाचे लक्षण आहे आणि हे मला माहितीये. मला सुद्धा जगायचे होते. पण काय करू इथे आत्मसन्मान आणि समाधान नाहीये, तर जगून तरी काय करू …माझी बायको कांचन शर्मा आणि तिची आई विनू शर्मा यांनी मला कधीच समजून घेतले नाही किंवा कधी तसा प्रयत्न देखील केला नाही. माझी बायको खूपच संतापी आहे. आमच्या दोघांच्याही व्यक्तीमत्वात खूप फरक आहे…रोज सकाळ-संध्याकाळ होणारी भांडणं सहन करण्याची आता माझ्यात शक्ती नाही… यात माझ्या बायकोची चूक नाही…कारण तिला सगळे सामान्यच वाटते… पण माझ्यासाठी ते असामान्य आहे…
मी मागील अनेक वर्षांपासून मुंबईत आहे… खूप वाईट वेळही पाहिली पण कधी इतका तुटलो नव्हतो… खूप काम केले, डबिंग केले, जिम ट्रेनर झालो. वन रुम किचनमध्ये ६ जणांसोबत राहिलो… खूप संघर्ष होता मात्र समाधान होते. आज मी खूप काही मिळवले आहे. पण लग्नानंतर मिळणारे समाधान मला कधीच नाही मिळाले. मागच्या २ वर्षात खूप काही बदलले आहे. ही गोष्टी मी कुणासोबत शेअर करु शकत नाही. जगाला सर्वकाही ठीक सुरु आहे असेच वाटत असेल… कारण ते फक्त आमच्या सोशल मीडिया पोस्ट किंवा स्टोरी पाहतात. जे सगळे खोटे आहे… जगाला आम्ही आमची चांगली प्रतिमा दाखवण्यासाठी हे टाकतो. पण हे सर्व खोटे आहे. एक विनंती आहे, मी गेल्यानंतर कांचनला काहीच बोलू नका, फक्त तिच्या डोक्याचा इलाज करा.”
३३ वर्षीय संदिपने अनेक चित्रपटांत उत्कृष्ट अभिनय केला होता. त्याच्या जाण्याने सिनेजगतातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा-
–मी तुम्हाला खूप त्रास देत आहे म्हणत प्रसिद्ध टिक टॉक स्टार डेझरियाची आत्महत्या
–कुमकुम फेम अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी केली होती आत्महत्या, वाचा कारण
–सुपरस्टार अभिनेत्री ते शक्तिशाली महिला राजकारणी, अम्मा.! मृत्यूनंतर शेकडो चाहत्यांनी केल्या आत्महत्या