Sunday, December 8, 2024
Home अन्य ‘मी तुम्हाला खूप त्रास देत आहे’, म्हणत प्रसिद्ध टिक टॉक स्टार डेझरियाची आत्महत्या

‘मी तुम्हाला खूप त्रास देत आहे’, म्हणत प्रसिद्ध टिक टॉक स्टार डेझरियाची आत्महत्या

टिक टॉक हे ऍप माहित नसलेला या जगात एकही व्यक्ती सापडणार नाही. अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांचं या ऍपने वेड लावले. काही दिवसांपूर्वी भारतात टिक टॉकवर बंदी घालण्यात आली, मात्र इतर देशांमध्ये टिक टॉक अजूनही चालू आहे. या टिक टॉकच्या माध्यमातून अनेक सामान्य वाटणारे लोक अचानक स्टार झाले. सेलेब्रिटींसारखी फॅन फॉलोविंग त्यांना मिळू लागली. पण काही दिवसांपासून काही टिक टॉक स्टार कलाकार आत्महत्या करत आहेत.

नुकतेच अमेरिकेतील डेझरिया शेफर या टिक टॉक स्टारने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, “मला माहित आहे, मी तुम्हाला खूप त्रास देत आहे आणि ही माझी शेवटची पोस्ट आहे.”

डेझरियाचे टिक टॉकवर Bxbygirlldee या नावाने अकाऊंट होते. तिला अनेक मिलियन फॉलोवर्स होते. शिवाय तिला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर सुमारे १ लाख फॉलोवर्स होते. डेझरियाने सोमवारी सांगितले होते की, तिला न कळवता थेट तिचे टिक टॉक अकाऊंट ब्लॉक केले गेले.

डेझरियाच्या आई, वडिलांनी फेसबुकवर एक पोस्ट शेयर करत आत्महत्येची माहिती दिली. डेझरियाच्या वडिलांनी सांगितले की, “डेझरिया माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिला दफन करण्याची माझी बिलकुल इच्छा नव्हती. तिने माझ्याशी तिच्या तणावाबद्दल आणि तिच्या समस्येबद्दल बोलायला हवे होते. नक्कीच आम्ही यातून काही मार्ग काढला असता. आता जेव्हा मी घरी जाईल तेव्हा ती माझी वाट पाहत नसेल. मी त्या सर्व लोकांना धन्यवाद म्हणू इच्छितो ज्यांनी माझ्या मुलीला खूप प्रेम आणि पाठिंबा दिला.”

डेझरियाच्या आईने सांगितले, “मी खूपच हतबल आहे. मी या घडलेल्या घटनेवर बिलकुल विश्वास ठेऊ शकत नाही. मी हाच विचार करत होती की, ही तिची एखादी मस्ती असावी. मात्र, असे नाहीये तू जिथे असशील तिथे शांत राहा माझी परी. आज आमच्या वाईट काळाबद्दल सर्व बोलत आहे, पण आमच्या चांगल्या काळाबद्दल कोणीच बोलले नव्हते.”

काही दिवसांपूर्वी सिया कक्कड या टिक टॉक स्टारने देखील दिल्लीतील तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वयाच्या १६ व्या वर्षीच ती खूप मोठी आणि लोकप्रिय टिक टॉक स्टार होती. तिला सोशल मीडियावर ११ लाख फॉलोवर्स होते, तर इंस्टाग्रामवर ९१ हजार फॉलोवर्स होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-Video: हेल्मेट न घालता बाईकवर स्टंट करणे जॉन अब्राहमला पडले महागात; नेटकऱ्यांनी शिकवला चांगलाच धडा
-तेलुगु अभिनेत्रीने ‘सैंया जी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स; सोशल मीडियावर चाहते झाले घायाळ, पाहा व्हिडिओ
-हॅप्पी बर्थडे! हॉट आणि बोल्ड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेले ३ धक्कादायक खुलासे, ज्यांनी बॉलिवूडमध्ये घातला होता धुमाकूळ

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा