Friday, March 13, 2026
Home बॉलीवूड ‘त्या’ घोड्यासाठी दोन कोटी मोजायलाही तयार होता सलमान खान, मालकाने स्पष्ट शब्दांत दिला नकार

‘त्या’ घोड्यासाठी दोन कोटी मोजायलाही तयार होता सलमान खान, मालकाने स्पष्ट शब्दांत दिला नकार

कोट्यवधींची कमाई करणारा भाईजान हा फक्त आपले  सहकलाकार नाही तर सर्वसामान्यांना देखील मदतीचा देत असतो. परंतु त्याला जेव्हा एखादी गोष्ट हवी असेल आणि ती मिळत नसेल तर.. ही गोष्ट ऐकायला फार विचित्र वाटत असेल पण तितकीच खरी देखील आहे. अशी एक गोष्ट आहे ज्याची ऑफर खुद्द सलमान खानने दिली होती परंतु समोरील व्यक्तीने भाईजानची ही ऑफर चक्क नाकारली.

बॉलिवूडचा दबंग किंग अर्थातच सलमान खानची स्टाईल कोणापासूनच लपलेली नाही आहे. सुरूवातीपासूनच जनावरांची आवड असलेल्या सलमान खानकडे अनेक प्रकारचे प्राणी आहेत, ज्याचे पालन तो स्वतः करतो. त्यातच सलमानकडे अनेक महागडे घोडे देखील आहेत. लॉकडाऊनच्या काळात सलमान खानला त्याच्या पनवेलच्या फार्महाऊसमध्ये आपल्या घोड्याला चारा भरवताना चाहत्यांनी सोशल मीडियावर पाहिले होते आणि त्यावेळी त्याचा तो फोटो करोडोंच्या घरात प्रेक्षकांनी पहिला होता. त्याच्या आपल्या घोड्यांवरचे प्रेम यातूनच दिसून येते.

अशातच सलमान खान याला परमवीर नावाचा एक घोडा आवडला होता आणि त्याने हा घोडा विकत घ्यायचे ठरवले होते. परंतु घोड्याच्या मालकाने चक्क त्याला विकण्यास स्पष्टपणे नकार दिला. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, फरीदाकोट येथे ‘हॉर्स ब्रीडर्स’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी सलमान खानची टीम तेथे उपस्थित होती आणि त्यांनी परमवीरला तेथे पाहिले व पाहताक्षणीच तो त्यांना पसंत पडला होता. सलमानची टीम त्याला विकत घेण्याच्या प्रयत्नात होती मात्र त्याच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला.

गुजरातच्या अहमदाबाद येथील रणजितसिंह राठोड यांचे हे दोन घोडे असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षी परमवीर हा स्पर्धेतील लोकांच्या आकर्षणाचे केंद्र होता आणि रिलायन्स समूहाने त्याची किंमत १ कोटी रुपये इतकी ठेवली होती. परंतु सलमान खानची टीम त्याला विकत घेण्यास अयशस्वी ठरली. या परमवीरच्या दिवसाचा सरासरी खर्च हा एक ते दोन हजाराच्या घरात आहे. सन २०१८ मध्ये देखील सलमान सोबत असेच काहीसे झाले होते, त्यावेळी देखील त्याच्या पदरी निराशा पडली होती.

सन २०१८ मध्ये सलमान खानला ‘सकाब’ नामक एक सहा वर्षाचा घोडा आवडला होता आणि हा घोडा सुरत जवळ ओलपाड शहरात राहणाऱ्या सिराज खान पठाण यांचा होता. सलमानने सकाबला विकत घेण्यासाठी एका एजन्टला २ करोडची ऑफर घेऊन पठाण यांच्याकडे पाठवले होते परंतु त्यांनीसुद्धा हा घोडा विकण्यास नकार दिला होता.

‘सकाब’ या घोड्याचे वैशिष्ट्य म्हणजे या घोड्याची जी जात आहे, त्या जातीचे फक्त दोनच घोडे या जगात आहेत त्यातला एक कॅनडा तर दुसरा अमेरिकेत. हा घोडा ४३ किलोमीटर वेगाने कुठेसुद्धा उडी न मारता अगदी वेगाने धावू शकतो. त्यामुळे सलमानला हा घोडा हवा होता जेणेकरून या घोड्याची राईड करता आली असती.

अभिनेता सलमान खानने आपल्या आगामी ‘अंतिम ‘ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले असून या चित्रपटात तो शीख पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. हा चित्रपट प्रवीण तरडे यांच्या गाजलेल्या मुळशी पॅटर्न चित्रपटाचा हिंदी रिमेक असून याचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करीत आहेत. सोबतच राधे या चित्रपटात देखील तो दिसणार असून यात तो ड्रग माफिया बनलेल्या रणदीप सोबत दिसणार असून रणदीप हा गोव्याचा ड्रग डीलर असून सायको असतो.

हे देखील वाचा