Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

बापरे! ‘पप्पी दे’ म्हणणं स्मिता गोंदकरला पडलं भलतंच महागात, खावी लागली कानफटात!

‘पप्पी दे पारूला’ म्हणत एका चेहऱ्याने लाखो हृदय चोरले. तो चेहरा म्हणजेच अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar). तिचे हे गाणे प्रचंड हिट ठरले. शिवाय या अल्बम गाण्याने तिला तूफान लोकप्रियताही मिळवून दिली. आजही प्रेक्षक जेव्हा हे गाणे ऐकत असतील तर नक्कीच स्मिताचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येत असणार. ती सतत वेगवेगळे अल्बम सॉंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शिवाय अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळेही बरीच चर्चेत असते. पुन्हा अभिनेत्री चर्चेत आली आहे. खरं तर स्मिताला ‘पप्पी दे पारूला’ गाणं म्हणणं भलतंच महागात पडलेलं दिसतंय.

अलीकडेच स्मिताने तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. या व्हिडिओमध्ये स्मिता तिच्या आईसोबत दिसली आहे. यात तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्री तिचं हिट गाणं ‘पप्पी दे पारूला’ गात आहे. जेव्हा स्मिता ‘पप्पी दे पप्पी दे पारूला’ म्हणते, तेव्हा शेजारी बसलेली तिची आई अभिनेत्रीच्या गालावर किस करते. स्मिता परत तेच वाक्य बोलते आणि तिची आई देखील पुन्हा किस करते. मग स्मिता ‘या प्रेम वेडीला’ म्हणते, तेव्हा तिची आई चांगलीच तापते. आणि अभिनेत्रीला एक कानफटात ठेऊन देते. (bigg boss marathi fame smita gondkar latest video viral update)

मायलेकीचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. चाहतेही यावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. यात कोणी आईचं कौतुक करतंय तर कोणी अभिनेत्रीचं!

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. शिवाय तिचे अल्बम सॉंग सतत रिलीझ होत असतात. स्मिता मराठी बिगबॉसच्या दोन्ही सीझनमध्ये झळकली आहे. तसेच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. याठिकाणी तिचे ५ लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा