Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुखही झाले ट्रेंडमध्ये सामील, ‘कच्चा बदाम’ गाण्यावर केला भन्नाट डान्स

धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) म्हणजे नव्वदच्या दशकातील प्रत्येक भारतीयांच्या स्वप्नातील सुंदरीच होती. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने माधुरीने तो काळ चांगलाच गाजवला होता. सहजसुंदर अभिनयाच्या जोडीला लाभलेले निखळ सौंदर्य या माधुरीच्या जमेच्या बाजू होत्या. याच अभिनयाच्या जोरावर माधुरी दीक्षितने ९०च्या दशकात सर्वांना वेड लावले होते. त्यामुळेच तिच्या अभिनयाची आजही चित्रपट जगतात चर्चा होत असते. आजही माधुरी दीक्षित अनेकदा आपल्या नृत्याने सर्वांना मोहीत करत असते. सध्या माधुरी दीक्षितचा असाच एक व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती रितेश देशमुखसोबत (Ritesh Deshmukh) थिरकताना दिसत आहे.

सध्या सोशल मीडियावर सर्वत्र ‘कच्चा बादाम’ गाण्याचीच चर्चा पाहायला मिळत आहे. गेले तीन महिने या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. आत्तापर्यंत यावर लाखो रिल्स तयार झाले आहेत. यामध्ये सामान्य प्रेक्षकांसह दिग्गज कलाकारांचाही समावेश आहे. आता यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुखही सहभागी झाले आहेत. माधुरी आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावरील जबरदस्त डान्स व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षितचे जोरदार ठुमके पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाची साडी घातलेली माधुरी दीक्षित खूपच सुंदर दिसत आहे. तर रितेशनेही धमाकेदार डान्स करत चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

हा व्हायरल व्हिडिओ माधुरी दीक्षितने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकांउटवरुन शेअर केला आहे. यावर आता चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. दरम्यान अभिनेता रितेश देशमुखही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. पत्नी जेनेलिया सोबतचे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ अनेकदा त्यांच्या चाहत्यांना पोटभरून हसायसा लावणारे असतात. आता माधुरी दीक्षित आणि रितेश दादाच्या या सुंदर व्हिडिओचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा