रसिकांना पुन्हा पाहायला मिळाली माधुरी दीक्षित अन् जॅकी श्रॉफची रोमॅंटिक केमिस्ट्री, भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) नृत्याचे असंख्य चाहते आपल्याला आजही पाहायला मिळतात. माधुरीच्या दमदार अभिनयाची, घायाळ करणाऱ्या सौंदर्याची चर्चा तर होताना दिसतेच, मात्र माधुरी दीक्षितच्या तडफदार डान्सनेही ९०च्या काळात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आजही अनेक कार्यक्रमात माधुरीला डान्स करण्यासाठी विनंती केली जाते. सध्या अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff)  यांचा एक डान्स व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघेही ९०च्या दशकातील गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनी ९०च्या दशकात ‘१०० डेज’ या चित्रपटातून प्रेक्षकांना त्यांची सुंदर केमिस्ट्री दाखवली होती. आता पुन्हा एकदा माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ त्याच स्टाईलमध्ये डान्स करताना दिसले आहेत. माधुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या ‘१०० डेज’ चित्रपटातील ‘सुन बेलिया’ गाण्यावर जॅकी श्रॉफसोबत रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये जग्गू दादाची तीच जुनी शैली सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचवेळी माधुरीच्या तुफान डान्सनेही सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरी आणि जॅकी श्रॉफचा हा इन्स्टा रील व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडिओ शेअर करत माधुरी दीक्षितने कॅप्शनमध्ये “१००डेजच्या या भन्नाट गाण्यावर हा रील बनवताना खूप वेळ घालवला. जॅकी श्रॉफने आपल्या डान्सने सेटवर आग लावली व्वा.” असे लिहले आहे. तत्पुर्वी माधुरी सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने इशान खट्टरसोबतही (Ishaan Khattar) अशी रील केली होती. इशानसोबत बनवलेल्या व्हिडिओमध्ये ती ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसली होती. व्हिडिओमध्ये ईशानही माधुरीसोबत थिरकताना दिसत होता. दरम्यान चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. माधुरी दीक्षितचा हा व्हिडिओ पाहून चाहते भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

दरम्यान नुकतेच माधुरी दीक्षितनेही ओटीटीच्या जगात पाऊल ठेवले आहे. माधुरी दीक्षित नेटफ्लिक्सच्या ‘द फेम गेम’ या वेब सीरिजमध्ये दिसली होती. ही मालिका खूप पसंत केली जात आहे. या सीरिजला आत्तापर्यंत सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहेत. माधुरी दीक्षितने स्वतः एका पोस्टमध्ये सांगितले होते की, या सिरीजला एका आठवड्यात ११.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ही सीरिज सध्या १६ देशांमध्ये ट्रेंड करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post