Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

शाहिद कपूरचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पत्नीला सहन करावे लागते ‘हे’ सर्व, मीरा राजपूतने व्यक्त केलं दु:ख!

अभिनेता शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) ‘जर्सी’ हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट गेल्या वर्षीच प्रदर्शित होणार होता, परंतु कोविडच्या निर्बंधांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली. अशातच आता १४ एप्रिलला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होणार आहे. दरम्यान, शाहिद कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो अभिनेत्याच्या पत्नीने शेअर केला आहे.

मीराने शेअर केला व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत सोशल मीडियावर एकमेकांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. नुकताच मीराने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये शाहिद खूपच मजेदार अंदाजात दिसत आहे. शाहिद म्हणतो, “तुम्ही सगळे… तुम्ही सगळे, जे माझा अपमान करता. याचा मला आतून त्रास होतो. पण मी काही म्हणतो? नाही! अपना टाईम आयेगा.” यानंतर, तो त्याच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाकडे बोट दाखवतो आणि त्याच्या तोंडातून शॉटचा आवाज काढून हेलिकॉप्टर शॉट दाखवतो. मीराने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, ‘याला कोणी ऑस्कर द्या.’ तसेच मीराने लिहिले की, “प्रत्येक रिलीझपूर्वी मला हे सर्व सहन करावे लागते.” (mira kapoor shared a video on social media of shahid kapoor shahid kapoor jersey)

https://www.instagram.com/reel/Cb-Z9CDlYrX/?utm_source=ig_embed&ig_rid=db3e8f54-f173-4caf-9192-1f20fbbed421

कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीये शाहिद
अनेक मुलाखतींमध्ये शाहिदने मीराचा उल्लेख केला आहे आणि ती त्याच्या आयुष्याची प्राथमिकता असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, “मला लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपची भीती वाटते. मला जो काही वेळ मिळेल, तो मला माझ्या पत्नी आणि मुलांसोबत घालवायचा आहे. माझ्या पत्नीला असे वाटते की, मी तिला प्राधान्य देत नाही. म्हणून मी स्वत: ला यासाठी पुरेसा वेळ न दिल्याबद्दल दोष देतो. मी माझ्या घरच्यांना म्हणतो की, मला थोडं कामही करू द्या.”

१४ एप्रिलला रिलीझ होणार चित्रपट
तुम्हाला सांगतो, ‘कबीर सिंग’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर शाहिद कपूर ‘जर्सी’ या क्रिकेट ड्रामामध्ये दिसणार आहे. त्याच्यासोबत मृणाल ठाकूरही मुख्य भूमिकेत आहे. ‘जर्सी’ १४ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीझ होणार आहे. जर्सी हा २०१९च्या तेलगू चित्रपट ‘जर्सी’चा रिमेक आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन गौतम तिन्ननुरी यांनी केले आहे. ‘जर्सी’ बॉक्स ऑफिसवर ‘केजीएफ चॅप्टर २’ला टक्कर देणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा