Thursday, July 18, 2024

‘या’ गोष्टीमुळे शाहिद कपूरला अनावर झाला राग, पाहून आजूबाजूचे लोक लागले घाबरू, पाहा व्हिडिओ

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच बॉक्स ऑफिसवर धूम ठोकणार आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, शाहिद कपूरचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा एक मजेदार व्हिडिओ आहे जो खास रिल्ससाठी बनवला आहे. व्हिडिओमध्ये शाहिद (shahid kapoor)कॉफीसाठी ओरडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शाहिद मोठ्या आवाजात लोकांना खूप प्यायला सांगत आहे. यादरम्यान त्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घाबरले. शाहिदच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. व्हिडिओमध्ये तो खूपच मजेशीर अंदाजात दिसत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये शाहिदने लिहिले की, “कोणाला कॉफी हवी आहे का?” शाहिदच्या व्हिडिओला यूजर्सकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले की, “मग कॉफी विथ करण शोमध्ये जा.” दुसरीकडे, दुसर्‍या यूजरने लिहिले, “तुझ्यासोबत फक्त कॉफी घेऊ.”

शाहिद कपूर त्याच्या आगामी चित्रपट ‘जर्सी’मध्ये क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट साऊथचा रिमेक आहे. या चित्रपटात त्याच्याशिवाय मृणाल ठाकूर देखील दिसणार आहे. हा चित्रपट १४ मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. शाहिदचे चाहते या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. हा चित्रपट गेल्या वर्षी २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे त्याची तारीख पुढे ढकलावी लागली.

विशेष म्हणजे आपल्या अभिनय कारकिर्दीत शाहिदने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. २००३ मध्ये त्याने ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तो अनेक चित्रपटांमध्ये दिसला. मात्र, एक वेळ अशी आली जेव्हा त्याचे चित्रपट फारसे चालत नव्हते. असे असूनही शाहिदने हार मानली नाही आणि ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा